SIP vs FD: गुंतवणुकीबाबत विचार करताना बहुतांश लोक दोन लोकप्रिय पर्याय निवडतात एक म्हणजे SIP आणि दुसरा म्हणजे FD. हे दोन्ही पर्याय वेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आहेत आणि त्यांच्या गरजांनुसार फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला कोणता पर्याय निवडावा, हे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर, जोखीम घेण्याच्या तयारीवर आणि गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून आहे.
SIP म्हणजे काय?
एसआयपी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एसआयपी ही एक प्रणालीबद्ध गुंतवणूक पद्धत आहे, जिच्यात तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवता. ही गुंतवणूक शेअर बाजाराशी संबंधित असल्याने दीर्घकालीन चांगल्या परताव्याची शक्यता असते. एसआयपीचे अनेक फायदे आहेत. ते चक्रवाढीचा फायदा देते. गुंतवणुकीवर परतावा देखील कालांतराने परतावा मिळतो, ज्यामुळे भांडवल वेगाने वाढते. परंतु, यामध्ये बाजाराशी निगडित जोखीम असते, जी लक्षात घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा -LIC New Scheme: महिलांसाठी एलआयसीची नवी योजना; दरमहा 7,000 रुपये कमवण्याची संधी
SIP चे फायदे -
बाजारातील सरासरी किंमतीचा फायदा
चक्रवाढीचा प्रभाव
दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी उपयुक्त (निवृत्ती, शिक्षण, घर)
लवचिक रक्कम आणि शिस्तबद्ध गुंतवणूक
FD म्हणजे काय?
एफडी, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. हा एक पारंपरिक व सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे, जिथे निश्चित व्याजदराने ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवले जातात. बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकांना ही सेवा देतात. जोखीम टाळू इच्छिणाऱ्यांसाठी आणि भांडवलाची सुरक्षितता जपणाऱ्यांसाठी हा आदर्श पर्याय आहे.
FD चे फायदे -
निश्चित आणि सुरक्षित परतावा
जोखीमशून्य गुंतवणूक
आगाऊ व्याज दर माहीत असतो.
काही एफडीवर करसवलतीचा लाभ
एसआयपी की एफडी? तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य?
जर गुंतवणूक सुरक्षितता महत्त्वाची असेल, तर एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच दीर्घ मुदतीसाठी संपत्ती वाढवायची असेल, तर एसआयपी फायदेशीर आहे. जर मध्यम ते उच्च जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल, तर एसआयपी निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते. तथापी, जर एकरकमी रक्कम गुंतवायची असेल, तर एफडी अधिक योग्य ठरू शकते. तसेच जर तुम्हाला शिस्तबद्ध, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करायची असेल, तर एसआयपी हा चांगला मार्ग आहे.
हेही वाचा - ITR Filing Documents: पहिल्यांदाच आयकर भरत आहात? ही 7 कागदपत्रं आधीच तयार ठेवा
खरं तर, एफडी आणि एसआयपी हे एकमेकांना पूरक असलेले पर्याय आहेत. जर तुम्ही दोन्ही पर्यायांचा योग्य ताळमेळ साधला, तर तुम्ही सुरक्षिततेसह परतावा वाढवू शकता. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी एसआयपी आणि तातडीच्या गरजांसाठी एफडी हा संयमित दृष्टिकोन तुमच्या गुंतवणुकीला यशस्वी बनवू शकतो. गुंतवणूक करताना फक्त परतावा बघू नका, तर जोखीम, कालावधी, तुमची आर्थिक स्थिती, आणि उद्दिष्टे यांचाही विचार करा.
Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!