छत्रपती संभाजीनगर: रविवारी सकाळी नंद्राबादजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर छावणीतील सुभेदार मनोजकुमार काटकर यांच्या भरधाव कारने शेतकऱ्यांना धडक दिली. ही घटना सकाळी 8 वाजता तलत कॉलेजजवळ छत्रपती संभाजीनगर-खुल्दाबाद रस्त्यावर घडली.
या अपघातात ज्ञानेश्वर जाधव (वय,34) आणि अशोक घुसळे (वय, 55) या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही रस्त्याच्या कडेला चालत असताना एमएच-24-बीएच-5663 क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली. अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. काटकर हे त्यांच्या पत्नीसमवेत खुल्दाबादला जात होते. यावेळी त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.
हेही वाचा - Washim: रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; कुटुंबियांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न -
अपघातानंतर आरोपी काटकर यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र म्हैसमाळ रोडवर त्यांना अटक करण्यात आली. खुल्दाबाद पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल झाकीर शेख आणि सिद्धार्थ सदावर्ते यांनी त्वरीत कारवाई करत आरोपी चालकाला पकडले.
हेही वाचा - Gondia Accident: ट्रक अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर; ट्रक चालकाच्या डोळ्यात लोखंडी साखळी गेल्याने अपघात
दरम्यान, खुल्दाबाद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील कार्यवाहीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. आरोपी सुभेदार काटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या अपघाताचा अधिक तपास करत आहे.