मुंबई: सणासुदीचा काळ देशात नेहमीच आर्थिक घडामोडींसाठी महत्त्वाचा असतो. यंदा सणासुदीचा काळ सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अॅडेको इंडिया च्या ताज्या अहवालानुसार, 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत तब्बल 2.16 लाख हंगामी नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही भरती 15 ते 20 टक्क्यांनी अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक भरती?
या काळात सर्वाधिक मागणी रिटेल, ई-कॉमर्स, बँकिंग व फायनान्स (BFSI), लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, आणि एफएमसीजी या क्षेत्रांमध्ये असणार आहे. रक्षाबंधन, दसरा, दिवाळी, तसेच हंगामी सेल्स आणि लग्नसराई या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी भरती प्रक्रिया आधीच सुरू केली आहे.
भरतीमागील मुख्य कारणे
अहवालानुसार भरतीत वाढ होण्यामागील महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे:
ग्राहकांचा सकारात्मक दृष्टिकोन
चांगला पावसाळा व त्यामुळे वाढलेली ग्रामीण मागणी
निवडणुकांनंतरचा आर्थिक आत्मविश्वास
आक्रमक हंगामी प्रचार व विक्री धोरणे
सर्वाधिक भरती कुठे होणार?
दिल्ली-NCR, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे या मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक भरती अपेक्षित आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 19% अधिक असेल. याशिवाय, लखनौ, जयपूर, नागपूर, कोइम्बतूर, भुवनेश्वर, म्हैसूर आणि वाराणसी येथे 42% पर्यंत रोजगाराच्या संधीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, कानपूर, कोची आणि विजयवाडा यांसारख्या शहरांमधील मागणीही झपाट्याने वाढते आहे.
हेही वाचा - सोशल मीडिया रील बनवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार देत आहे
पगार आणि भूमिका -
मेट्रो शहरांमध्ये पगार वाढ: 12-15%
टियर-2 शहरांमध्ये वाढ: 18-22%
लॉजिस्टिक्स व डिलिव्हरी: भरतीत 30-35% वाढ
हेही वाचा - PM Kisan 20th Installment: पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार
महिलांचा सहभाग वाढला
दरम्यान, अहवालानुसार, महिलांचा सहभाग २३% ने वाढला आहे. विशेषतः महिलांचा लवचिक आणि अल्पकालीन नोकऱ्यांकडे कल वाढला आहे. आता भरती ही केवळ संख्या नसून एक रणनीती बनली आहे. अॅडेको इंडियाचे जनरल स्टाफिंग हेड दीपेश गुप्ता यांनी सांगितले की, आता कंपन्या केवळ मोठ्या संख्येवर लक्ष केंद्रित करत नाहीत तर जलद तैनाती, कौशल्य फिटिंग आणि दीर्घकालीन कार्यबल तयार करण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहेत.