Wednesday, August 20, 2025 09:12:50 PM

हैदराबादमध्ये 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या; लुडो गेममध्ये 5 लाख रुपये गमावल्याने उचलले टोकाचे पाऊल

वेंकटेश मूळचा महबूबनगर जिल्ह्यातील जकलेर गावचा असून, सध्या तो हैदराबादमधील एका रोस्ट कॅफेमध्ये माळी म्हणून काम करत होता.

हैदराबादमध्ये 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या लुडो गेममध्ये 5 लाख रुपये गमावल्याने उचलले टोकाचे पाऊल
Edited Image

हैदराबाद: हैदराबादमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने आणखी एक तरुण बळी गेला आहे. गद्दामेदी वेंकटेश (वय 23) या युवकाने लुडो गेम खेळताना तब्बल 5 लाख रुपये गमावले. त्यानंतर नैराश्यातून विष प्राशन करून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे गद्दामेदी वेंकटेशच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा - गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल कायदाशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक

वेंकटेश मूळचा महबूबनगर जिल्ह्यातील जकलेर गावचा असून, सध्या तो हैदराबादमधील एका रोस्ट कॅफेमध्ये माळी म्हणून काम करत होता. ऑनलाइन लुडो गेममध्ये त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर हताश झालेल्या वेंकटेशने विष प्राशन करून आयुष्य संपवलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा - 9 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय घ्या जाणून

या घटनेमुळे वेंकटेशच्या कुटुंबाला आणि मित्रांना धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तरुणाच्या दुःखद आत्महत्येचे प्रकरण ऑनलाइन जुगार खेळण्याचे धोके अधोरेखित करते. खऱ्या पैशांचा वापर करणारे ऑनलाइन गेमिंग धोकादायक असून जीवघेणे ठरू शकतात. सध्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर सरकारने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी देखील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
 


सम्बन्धित सामग्री