नवी दिल्ली: 22 एप्रिल रोजी पाहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आक्रमक पावले उचलली आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे देशभरातील काही विमानतळे बंद करण्यात आली होती. परंतु, ही बंदी आता उठवण्यात आली असून ती नियमित नागरी उड्डाणांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता भारताने 15 मेपर्यंत पहाटे 5:29 वाजेपर्यंत जवळपास 32 विमानतळे तात्पुरती बंद ठेवण्याची घोषणा केली होती, अशी माहिती शुक्रवारी भारताच्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नोटिस टू एअरमनमध्ये (NOTAM) दिली होती. मात्र, सोमवारी तात्काळ प्रभावाने नोटिस टू एअरमन (NOTAM) रद्द करण्यात आला आणि लवकरच नियमितपणे विमानतळांवरून पुन्हा उड्डाणे सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.



ही विमानतळे आता तात्पुरते प्रभावाने नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी उपलब्ध आहेत. तसेच, प्रवाशांनी विमान कंपन्यांकडून थेट विमानाची स्थिती तपासून घ्यावी आणि नियमित अपडेटसाठी विमान कंपन्यांच्या वेबसाइट्सचे निरीक्षण करावे, अशी माहिती एअरलाईन्स प्राधिकरणाने एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.