shubhanshu shukla parents
Edited Image
Axiom-4 Mission: अब्जावधी लोकांच्या आशा आणि स्वप्ने घेऊन जाणारे अॅक्सिओम मिशन-4 हे यान आज दुपारी 12:01 वाजता केनेडी स्पेस सेंटरवरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले. त्यात भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि इतर तीन क्रू मेंबर्स होते. हे मिशन 14 दिवसांचे आहे. 28 तासांच्या प्रवासानंतर हे मिशन गुरुवारी सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) उतरेल. या मोहिमेत भारत, हंगेरी, अमेरिका आणि पोलंडमधील अंतराळवीरांचा समावेश आहे.
अॅक्सिओम मिशन-4 च्या यशस्वी उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले की, 'भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे आम्ही स्वागत करतो. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय बनणार आहेत. 1.4 अब्ज भारतीयांच्या प्रार्थना, आशा आणि आकांक्षा त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या आणि इतर अंतराळवीरांना आमच्या शुभेच्छा.'
शुभम शुक्लाचे पालक भावूक -
दरम्यान, शुभांशू शुक्लाच्या आईने म्हटलं आहे की, 'या क्षणी माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही. मी खूप आनंदी आहे. मला माहित आहे की तो यशस्वी होईल. यशस्वी मोहिमेनंतर मी त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.' शुभांशूचे वडील शंभू शुक्ला म्हणाले, 'हा केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या देशासाठीही एक उत्तम क्षण आहे. या क्षणी आपण काय म्हणू शकतो, आता माझ्याकडे शब्द नाहीत... माझे आशीर्वाद नेहमीच माझ्या मुलासोबत आहेत.'
हेही वाचा - Shubhanshu Shukla: शुभांशू शुक्ला यांची अंतराळ झेप
फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर (केएससी) येथून स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटमधून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अवकाशात रवाना होताच, नवाबांच्या शहर लखनऊच्या गौरवशाली इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला. कानपूर रोडवरील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या वर्ल्ड युनिटी कन्व्हेन्शन सेंटर ऑडिटोरियममध्ये या क्षणाचे थेट प्रक्षेपण पाहणारे शुक्लाचे कुटुंब यावेळी भावूक झाले.
हेही वाचा - रेल्वेने प्रवास करणे महागले! तिकिटांच्या किमतीत वाढ वाढ; 1 जुलैपासून लागू होणार नवीन दर
राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशू शुक्लाने रचला इतिहास -
1984 मध्ये राकेश शर्माने सोयुझ अंतराळयानात इतिहास रचला होता. त्यानंतर, 41 वर्षांनंतर, शुभांशू शुक्लाच्या रूपात भारत मानवी अंतराळ उड्डाणात परतला आहे. स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटने उड्डाण करताच शुभांशू शुक्लाचे पालक आणि नातेवाईक यांच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले.