Bank Holidays in September 2025: सप्टेंबर 2025 मध्ये देशातील विविध राज्यांमधील बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. यात 4 रविवार, 2 शनिवार आणि विविध राज्यांतील स्थानिक सण व उत्सवांचा समावेश आहे. वेगवेगळ्या स्थानिक सणांसाठी बँकांना एकूण 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. तुमच्या राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील ते जाणून घेऊयात...
सप्टेंबरमध्ये 4 रविवार आणि 2 शनिवार सुट्टी -
रविवार असल्याने देशातील सर्व बँका 7, 14, 21 आणि 28 सप्टेंबर 2025 रोजी बंद राहतील. याशिवाय, 13 सप्टेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार आणि 27 सप्टेंबर हा महिन्याचा चौथा शनिवार असेल, ज्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील. याशिवाय, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्थानिक सणांमुळे 3, 4, 5, 6, 12, 22, 23, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी बँका बंद राहतील.
राज्यनिहाय बँकांच्या सुट्ट्या -
3 सप्टेंबर – करमपूजा (झारखंड)
4 सप्टेंबर – ओणम (केरळ)
5 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी (गुजरात, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, मणिपूर, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली, झारखंड, आंध्र प्रदेश)
6 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी (छत्तीसगड), इंद्रजत्रा (सिक्कीम)
12 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद (जम्मू-काश्मीर)
22 सप्टेंबर – नवरात्र स्थापना (राजस्थान)
23 सप्टेंबर – महाराजा हरि सिंह जयंती (जम्मू-काश्मीर)
29 सप्टेंबर – महासप्तमी/दुर्गा पूजा (त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल)
30 सप्टेंबर – महाअष्टमी/दुर्गा अष्टमी/दुर्गा पूजा (त्रिपुरा, ओडिशा, आसाम, मणिपूर, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड)
हेही वाचा - Health Insurance: वैद्यकीय महागाईमुळे ‘या’ दोन हेल्थ इन्शुरन्सची कॅशलेस सुविधा बंद; रुग्णांसमोर नवीन संकट
सलग सुट्ट्या -
त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान सलग 3 दिवस बँका बंद राहतील.
28 सप्टेंबर – रविवार
29 सप्टेंबर – महासप्तमी
30 सप्टेंबर – महाअष्टमी/दुर्गा पूजा
हेही वाचा - Reliance Jio IPO: रिलायन्स जिओचा आयपीओ कधी येणार? गुंतवणूकदारांसाठी मुकेश अंबानींनी केली खास घोषणा
त्यामुळे जर तुम्हाला बँकेची काही महत्वाची कामे असतील तर ती वेळेत उरकून घ्या, अन्यथा अडचण येऊ शकते. विशेषत: चेक क्लिअरन्स, कर्जाशी संबंधित कागदपत्रे, खाते उघडणे किंवा रोकड व्यवहार यांसारख्या कामांसाठी तुम्हाला बँकेच्या सुट्टींचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे. ज्या राज्यांमध्ये सलग सुट्ट्या आहेत, तेथे नागरिकांनी विशेष सतर्क राहून आवश्यक ती कामे आधीच पूर्ण करून ठेवावीत, अन्यथा आर्थिक व्यवहारांमध्ये उशीर होऊ शकतो.