Wednesday, August 20, 2025 08:32:13 PM

तामिळनाडूत अ‍ॅसिड फेकून ज्वेलरी शॉप लुटण्याचा प्रयत्न; घटना CCTV मध्ये कैद

दुकानाचे मालक वैथीश्वरन, पत्नी सेल्वा लक्ष्मी आणि कर्मचारी वासंती ग्राहकांना दागिने दाखवत असताना, ग्राहक असल्याचे भासवून आलेल्या दोन पुरूषांपैकी एकाने अचानक अ‍ॅसिड हल्ला केला.

तामिळनाडूत अ‍ॅसिड फेकून ज्वेलरी शॉप लुटण्याचा प्रयत्न घटना cctv मध्ये कैद
Edited Image

सालेम: तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील अथुर टाउन पोलिस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर मंगळवारी रात्री झालेल्या धक्कादायक दरोड्याच्या प्रयत्नात, दोन सशस्त्र दरोडेखोरांनी दागिन्यांच्या दुकानाच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यांवर अ‍ॅसिड फेकून चोरीचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक नागरिकांच्या धाडसी कृतीमुळे दोघेही आरोपी रंगेहात पकडले गेले.

काय आहे नेमकं प्रकरण? 

दिनमलार टीव्हीच्या वृत्तानुसार, रात्री सुमारे 8:45 वाजता अथुरच्या कडायेथी भागातील एव्हीएस ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. दुकानाचे मालक वैथीश्वरन, पत्नी सेल्वा लक्ष्मी आणि कर्मचारी वासंती ग्राहकांना दागिने दाखवत असताना, ग्राहक असल्याचे भासवून आलेल्या दोन पुरूषांपैकी एकाने अचानक अ‍ॅसिड हल्ला केला. त्यानंतर चोरांनी ड्रॉवरमधील सुमारे 80 तोळे सोने हिसकावण्याचा प्रयत्न केला. वैथीश्वरनने प्रतिकार केल्यावर हल्लेखोरांनी दागिन्यांवर अ‍ॅसिड ओतले आणि रिव्हॉल्व्हर काढून धमक्या दिल्या. जखमी असूनही वैथीश्वरनने एका हल्लेखोराला धरून ठेवले, ज्यामुळे तो पळून जाऊ शकला नाही.

हेही वाचा - Ahaan Panday Video: अहान पांडेने खाल्ला 'विंचू'! नेटीझन्स म्हणाले, 'यापुढे तुझा एकही चित्रपट पाहणार नाही'

दुसरा आरोपी रिव्हॉल्व्हर हातात घेऊन शॉपिंग स्ट्रीटमधून पळू लागला. मात्र, जागरूक स्थानिकांनी जवळपास एक किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले. दोन्ही आरोपींना अथुर टाउन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत रिव्हॉल्व्हर जप्त केला. आरोपींची ओळख आणि पार्श्वभूमी तपासली जात आहे.

हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Viral Video: भयानक आपत्तीत चमत्कार! ढगफुटीच्या घटनेतून वाचलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ आला समोर

हल्ल्यात जखमी झालेल्या दुकानातील कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिस ठाण्याजवळच घडलेल्या या निर्लज्ज हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. संभाव्य मोठा अनर्थ टाळल्याबद्दल आणि तात्काळ कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांचे कौतुक होत आहे.
 


सम्बन्धित सामग्री