Monday, September 01, 2025 12:58:47 AM

Kamakhya Express Train Derails: कटकजवळ बेंगळुरू-कामाख्या एक्सप्रेस रुळावरून घसरली; सर्व प्रवासी सुखरूप

सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

kamakhya express train derails कटकजवळ बेंगळुरू-कामाख्या एक्सप्रेस रुळावरून घसरली सर्व प्रवासी सुखरूप
Kamakhya Express Train Derails
Edited Image

Kamakhya Express Train Derails: ओडिशातील कटकजवळील मंगुली येथे एसएमव्हीटी बेंगळुरू-कामाख्या एसी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 12551) रुळावरून घसरली. खुर्दा रेल्वे विभागात घडलेल्या या घटनेत, ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.  डीआरएम खुर्दा रोड, ईस्ट कोस्ट रेल्वे (ECOAR) चे जीएम/जनरल मॅनेजर आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

कामाख्या एक्सप्रेसचे रेल्वेचे 11 डबे रुळावरून घसरले - 

माध्यमांशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, एसएमव्हीटी बेंगळुरू-कामाख्या एसी एक्सप्रेसचे 11 डबे सकाळी 11:54 वाजता मंगुलीजवळील निर्गुंडी येथे रुळावरून घसरले. पूर्व किनारपट्टी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) अशोक कुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली. अद्याप कोणीही जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही. आम्ही आमची साधनसामग्री घटनास्थळी पाठवली असून एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या सेवांना कळवले आहे. 

हेही वाचा - PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान मोदी नागपूमधे दाखल; हेडगेवार स्मृतीस्थळ आणि दीक्षाभूमीला वंदन

कामाख्या एक्सप्रेस रुळावरून घसरली, पहा व्हिडिओ -  

हेही वाचा - रस्ते सुरक्षेबाबत गडकरींची मोठी घोषणा! आता दुचाकींसोबत दोन ISI हेल्मेट देणे बंधनकारक

रेल्वेने जारी केला हेल्पलाइन क्रमांक  - 

अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले की, आमचे अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पाठवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केल्या जात आहेत आणि हेल्पलाइन क्रमांक - 8455885999 आणि 8991124238 जारी करण्यात आले आहेत. अशोक कुमार मिश्रा यांच्या मते, रेल्वे रुळावरून घसरण्याचे कारण तपासानंतरच कळेल. 


सम्बन्धित सामग्री