Thursday, August 21, 2025 02:53:24 AM

मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला आग

प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर उतरताच सहाय्यक पॉवर युनिटमध्ये आग लागली. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

मोठी बातमी दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला आग
Air India plane catches fire प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

Air India Plane Catches Fire: एअर इंडियाच्या विमानात आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर उतरताच सहाय्यक पॉवर युनिटमध्ये आग लागली. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. यासंदर्भात अधिक माहिती एअर इंडियाने दिली आहे. 

हेही वाचा - मोठी दुर्घटना टळली! एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरले, 3 टायर फुटले

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'मंगळवारी हाँगकाँगहून दिल्लीला जाणारे विमान क्रमांक एआय 315, लँडिंग आणि गेटवर पार्क केल्यानंतर लगेचच सहाय्यक पॉवर युनिट (एपीयू) मध्ये आग लागली. प्रवासी विमानातून उतरत असताना ही घटना घडली. आग लागताच, सिस्टम डिझाइननुसार एपीयू आपोआप बंद झाला.'

हेही वाचा - इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; 40 मिनिटे हवेतचं घिरट्या घालत राहिले

कोणतीही जीवितहानी नाही - 

आगीमुळे विमानाचे कोणतेही नुकसान झाले आहे. तथापि, प्रवासी आणि कर्मचारी सामान्यपणे उतरले. पुढील चौकशीसाठी विमान थांबवण्यात आले आहे आणि आगीबद्दल नियामकांना माहिती देण्यात आली आहे.

APU म्हणजे काय?

APU म्हणजे Auxiliary Power Unit, हे विमानाच्या मागच्या टोकावर असते. तेAir India plane catches fire जमिनीवर असताना विमानातील इलेक्ट्रिकल आणि अन्य प्रणाली चालू ठेवण्यासाठी वापरले जाते.


सम्बन्धित सामग्री