Wednesday, August 20, 2025 09:36:22 AM

मोठी बातमी! भारत-अमेरिका व्यापार युद्धादरम्यान पुतिन दिल्ली दौऱ्यावर येणार

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमधील भेटीदरम्यान या दौऱ्याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते.

मोठी बातमी भारत-अमेरिका व्यापार युद्धादरम्यान पुतिन दिल्ली दौऱ्यावर येणार
Edited Image

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमधील भेटीदरम्यान या दौऱ्याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी डोवाल यांनी पुतिन यांच्या भारत भेटीबाबत उत्सुकता व्यक्त करत या दौऱ्यामुळे भारत-रशिया धोरणात्मक संबंध अधिक बळकट होतील, असा विश्वासही व्यक्त केला.

अमेरिका-भारत व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला विशेष महत्त्व - 

सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार तणाव सुरू असताना पुतिन यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण राजनैतिक घडामोड मानला जात आहे. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात केल्याने अमेरिका नाराज असून ट्रम्प यांनी भारतावर 50% पर्यंत आयात शुल्क लादले आहे. अजित डोवाल यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष पुतिन 2025 च्या अखेरीस भारतात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण म्हणजे 'आर्थिक ब्लॅकमेलिंग'; राहुल गांधींनी मोदींना दिला 'हा' सल्ला

पुतिन यांचा भारत दौऱ्याचा इतिहास

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा शेवटचा दौरा डिसेंबर 2021 मध्ये झाला होता. त्यावेळी 21 व्या शिखर परिषदेसाठी ते भारतात आले होते. यानंतर रशिया-युक्रेन युद्ध व कोविड-19 महामारीमुळे त्यांचा दौरा पुढे ढकलला गेला. आता तब्बल चार वर्षांनी ते पुन्हा भारतात येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात हा पुतिन यांचा सहावा दौरा ठरणार आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही; ट्रम्प यांच्या 50 टक्के कराच्या धमकीवर मोदींचे प्रत्युत्तर

दरम्यान, डोवाल यांनी म्हटलं आहे की, भारत आणि रशिया यांचे संबंध अनेक दशकांपासून मजबूत आहेत. आमची भागीदारी केवळ रणनीतिक नाही तर विश्वासावर आधारित आहे. या भेटीमुळे संरक्षण, ऊर्जा, आणि जागतिक स्थैर्याबाबत सखोल चर्चा होणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री