Wednesday, August 20, 2025 09:14:10 PM

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाकडून POCSO खटला बंद

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, जो दिल्ली न्यायालयाने स्वीकारला आहे. यासह हे प्रकरण बंद करण्यात आले आहे.

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा न्यायालयाकडून pocso खटला बंद
Brij Bhushan Sharan Singh
Edited Image

नवी दिल्ली: भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीन महिला कुस्तीपटूवरील बलात्कार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता, जो दिल्ली न्यायालयाने स्वीकारला आहे. यासह हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. ऑलिंपियन विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी ब्रिज भूषणवर ज्युनियर कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता आणि जंतरमंतरवर दीर्घ निदर्शने केली होती. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि माजी भाजप खासदार या प्रकरणात खटल्याला सामोरे जात होते. ब्रिजभूषण यांनी नेहमीच आरोप फेटाळून लावले होते.

हेही वाचा -  राज्यसभेच्या 8 जागांसाठी निवडणुका जाहीर; 19 जूनला होणार मतदान

दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजीच या प्रकरणात रद्दीकरण अहवाल दाखल केला होता. सुनावणीदरम्यान तक्रारदाराने पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध केला नाही. यापूर्वी 1 ऑगस्ट 2023 रोजी, कथित पीडिता आणि तिच्या वडिलांनी या प्रकरणातील पोलिस अहवालावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता आणि पोलिस तपासावर समाधान व्यक्त केले होते. भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा -  मोठी बातमी! पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पुत्र प्रतीक भूषण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, 'आम्हाला एका खोट्या आणि बनावट प्रकरणात न्यायालयीन विजय मिळाला आहे. प्रत्येक निराधार आरोप आता न्यायाच्या कठड्यासमोर उघड होत आहे. हा सत्याचा विजय आहे आणि भविष्यातही हा विजय असाच चालू राहील.'
 


सम्बन्धित सामग्री