Naxalites प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
सुकमा: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातून मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. येथील 16 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या सर्वांवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यापैकी 9 नक्षलवादी हे चिंतलनार पोलीस स्टेशन परिसरातील केरळपेंडा गावातील रहिवासी होते. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे केरळपेंडा गाव आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. राज्य सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत नक्षलमुक्त ग्रामपंचायतीला विकास प्रकल्पांसाठी एक कोटी रुपये देखील देण्यात येणार आहेत.
16 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण -
सुकमा जिल्ह्याचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितलं की, एका महिलेसह एकूण 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. राज्य सरकारच्या 'नियाद नेलनार' (तुमचे चांगले गाव) योजनेने प्रभावित होऊन या सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या योजनेअंतर्गत, नक्षलमुक्त गावांमध्ये विकास कामे सुलभ केली जाणार आहेत.
हेही वाचा - OMG! 20 वर्षांपासून पोहून पार करतात शाळेपर्यंतचे अंतर! कोण आहेत व्हायरल 'ट्यूब मास्टर'?
प्राप्त माहितीनुसार, या सर्व नक्षलवाद्यांवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. यापैकी दोघांवर प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस होते. त्यापैकी एक रीता उर्फ दोडी सुक्की (36) आणि राहुल पुनीम (18) यांच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. याशिवाय, लेकम लखमा (28) वर तीन लाख रुपये आणि इतर तीन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी दोन लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यापैकी 9 नक्षलवादी केरळपेंडा ग्रामपंचायतीचे होते. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे ही ग्रामपंचायत नक्षलमुक्त झाली आहे.
हेही वाचा - ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे कहर! 30 जणांचा मृत्यू
केरळपेंडा झाले नक्षलमुक्त -
नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे केरळपेंडा ही दुसरी ग्रामपंचायत नक्षलमुक्त झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बडेसट्टी ग्रामपंचायत नक्षलमुक्त घोषित करण्यात आली होती. येथील सर्व नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले होते. याशिवाय, सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना राज्य सरकारकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल.