Sunday, August 31, 2025 04:51:58 PM

'दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवले...; भाजप मंत्री विजय शाहांची कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी

विजय शहा यांनी म्हटलं की, 'ज्यांनी आमच्या मुलींचे सिंदूर पुसले, आम्ही त्यांच्याचं बहिणींला त्या लोकांकडे पाठवले आणि नग्न करून मारहाण केली.'

दहशतवाद्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवले भाजप मंत्री विजय शाहांची कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी
Vijay Shah On Colonel Sophia Qureshi
Edited Image

Vijay Shah On Colonel Sophia Qureshi: मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान विजय शहा यांनी म्हटलं की, 'ज्यांनी आमच्या मुलींचे सिंदूर पुसले, आम्ही त्यांच्याचं बहिणींला त्या लोकांकडे पाठवले आणि नग्न करून मारहाण केली.' ज्या व्यासपीठावरून विजय शहा यांनी हे वादग्रस्त विधान केले, त्या वेळी केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर व्यासपीठावर उपस्थित होत्या. मंत्री विजय शहा यांच्या या विधानानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

विजय शहा काय म्हणाले?

मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करताना म्हटलं की, 'आम्ही आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट करणाऱ्या लोकांच्या बहिणींला त्यांच्याकडे पाठवले आणि त्यांना मारहाण केली. त्यांनी आमच्या हिंदूंचे कपडे काढून मारले आणि पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बहिणीच्या माध्यमातून त्यांना मारहाण केली. पंतप्रधान मोदी त्यांचे कपडे काढू शकले नाहीत, म्हणून त्यांनी त्यांच्या समुदायाच्या बहिणीला पाठवले आणि म्हटले की जर तुम्ही आमच्या बहिणींना विधवा केले असेल तर तुमच्या समुदायाची बहीण येऊन तुम्हाला नग्न करून मारहाण करेल.'

काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी - 

या प्रकरणी काँग्रेसने विजय शहा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते उमंग सिंघर आणि काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज यांनी विजय शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उमंग सिंघर म्हणाले की, विजय शाह यांनी उच्च लष्करी अधिकाऱ्याबद्दल केलेले विधान केवळ लज्जास्पदच नाही तर ते सैन्य आणि महिला दोघांचाही अपमान आहे. लष्करी अधिकारी असो वा सैनिक, त्याला कोणताही धर्म नसतो, तो हिंदू किंवा मुस्लिम म्हणून गणला जात नाही. त्यांचा एकच धर्म आहे - देश. भारतीय जनता पक्ष वारंवार धर्माबद्दल बोलत असतो आणि अशा प्रकारची भाषा भाजपची विचारसरणी उघड करते. हे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. विजय शहा यांच्या या विधानाचा मी तीव्र निषेध करतो. या विधानाबद्दल त्यांनी तात्काळ माफी मागावी.

हेही वाचा - पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा - परराष्ट्र मंत्रालय

विजय शहा यांनी दिले स्पष्टीकरण - 

वादग्रस्त विधानानंतर प्रकरण वाढत असल्याचे पाहून मंत्री विजय शहा यांनी आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, माझ्या विधानाकडे चुकीच्या संदर्भात पाहिले जात आहे. आपल्या बहिणींचे सिंदूर नष्ट करणाऱ्यांना आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. माझ्या भाषणाकडे वेगळ्या संदर्भात पाहू नका. 

हेही वाचा - काश्मीरच्या कानाकोपऱ्यात पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे पोस्टर; शोधणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

दरम्यान, विजय शहा यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेसने मंत्र्यांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, 'आपल्या सैन्याच्या शूर मुली दहशतवाद्यांच्या बहिणी आहेत. मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी ही घृणास्पद गोष्ट सांगितली आहे. भारताच्या मुलींबद्दल हे लज्जास्पद विधान करण्यात आले आहे. ज्यांचा सर्वांना अभिमान आहे. तिला दहशतवाद्यांची बहीण म्हणून वर्णन केले आहे. हा आपल्या बलाढ्य सैन्याचा अपमान आहे.' 
 


सम्बन्धित सामग्री