पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानाला बॉम्बस्फोट करण्याची दहशतवादी धमकी देणाऱ्या कॉलरला मुंबई पोलिसांनी मुंबईतील चेंबूर भागातून अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत परदेश दौऱ्यापूर्वी त्यांना धमकीचा फोन आल्यानंतर मंगळवारी मुंबईतील चेंबूर परिसरातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. 11 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. या फोनमध्ये कॉलरने पंतप्रधान मोदी अधिकृत परदेश दौऱ्यावर असल्याने दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात, असं म्हटलं होतं. या फोनचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला.
हेही वाचा - Ayodhya Ram Mandir : मुख्य पुरोहिताला किती वेतन मिळते? जाणून घ्या आचार्य सत्येंद्र दास यांचा पगार
आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी -
मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा फोन करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये आहेत. तसेच आज ते दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
हेही वाचा - Sharad Pawar : शरद पवारांनी केलं एकनाथ शिंदेंच कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण फ्रान्समधील मार्सेल येथे पोहोचले आणि त्यांनी स्वातंत्र्यसैनिक व्ही.डी. सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पंतप्रधानांनी फ्रेंच कंपन्यांना सांगितले की, भारतात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. पॅरिसमधील 14 व्या 'भारत-फ्रान्स सीईओ फोरम'मध्ये मोदींसोबत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन देखील सामील झाले. आपल्या भाषणात, मोदींनी भारत आणि फ्रान्समधील वाढत्या द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्याचा दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला मिळालेल्या चालनेचा उल्लेख केला.