Wednesday, August 20, 2025 11:55:57 PM

अंतराळातून टिपण्यात आला उत्तरकाशीतील ढगफुटीचा विध्वंस; ISRO च्या फोटोमधून समोर आले भयानक दृश्य

उपग्रह प्रतिमांमधून मिळालेल्या विनाशाच्या खुणा पाहून तुम्ही कल्पना करू शकता की विनाशाचे दृश्य किती भयानक आहे. या फोटोमध्ये सर्वत्र मातीचे ढिगारे दिसत आहेत. संपूर्ण परिसर पाणी आणि चिखलाने भरलेला आहे.

अंतराळातून टिपण्यात आला उत्तरकाशीतील ढगफुटीचा विध्वंस isro च्या फोटोमधून समोर आले भयानक दृश्य
Uttarakhand Cloudburst ISRO Satellite Image
Edited Image

Uttarakhand Cloudburst ISRO Satellite Image: उत्तराखंडमधील धारली येथे झालेल्या ढगफुटीनंतरच्या विध्वंसाची भीषण दृश्ये आता अवकाशातून टिपलेल्या फोटोमधून समोर आली आहेत. इस्रो/एनआरएससीने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह प्रतिमांमधून या आपत्तीचे रौद्ररूप समोर आले आहे. उपग्रह प्रतिमांमधून मिळालेल्या विनाशाच्या खुणा पाहून, तुम्ही कल्पना करू शकता की विनाशाचे दृश्य किती भयानक आहे. या फोटोमध्ये सर्वत्र मातीचे ढिगारे दिसत आहेत. संपूर्ण परिसर पाणी आणि चिखलाने भरलेला आहे.

इस्रोने दोन चित्रे प्रसिद्ध केली आहेत. पहिली उपग्रह प्रतिमा 16 जून 2024 ची आहे, दुसरी उपग्रह प्रतिमा 7 ऑगस्ट 2025 ची आहे. उत्तराखंडमधील धारली आणि हर्सिल येथे 5 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुराचे मूल्यांकन करण्यासाठी कार्टोसॅट-2एस डेटा वापरण्यात आला आहे. उच्च रिझोल्यूशन प्रतिमांमध्ये बुडालेल्या इमारती, विखुरलेले ढिगारे आणि बदललेले नदीचे प्रवाह दिसून येतात. 

हेही वाचा - Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत 10 राज्यांतील पर्यटक अडकले; आतापर्यंत 409 जणांची सुटका

24 तास चालू बचाव कार्य - 

धारलीतील पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके सतत कार्यरत आहेत. चिनूक आणि एमआय 17 हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. हर्षिल येथे तयार केलेल्या हेलिपॅडवरून गुरुवारी 200 हून अधिक लोकांचे प्राण वाचवण्यात आले.

हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: महाराष्ट्राचे 34 पर्यटक उत्तराखंडमध्ये बेपत्ता?

चिनूक हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथकांसोबत जनरेटर, अन्न, पाणी आणि औषधे पोहोचवली जात आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटर लावून तात्पुरती वीजव्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या आपत्तीत अनेकांनी आपले घर, संपत्ती आणि कुटुंबीय गमावले आहेत. शेकडो लोकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. बेपत्ता लोकांच्या शोधासाठी बचाव पथके दिवस-रात्र कार्यरत आहेत.


सम्बन्धित सामग्री