राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानं वाद निर्माण झाला आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागे कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे चर्चांणा उधाण आले आहे. धनखड यांच्या राजीनाम्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांमध्ये भिडले आहेत. त्यामुळे संसदेत गदारोळ निर्माण झाला आणि दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या विरोधातही विरोधकांनी आंदोलन छेडले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखडांच्या राजीनाम्यावर पोस्ट केलेली आहे. जगदीप धनखड यांना देशसेवेची संधी मिळाली. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असे या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.