Thursday, August 21, 2025 02:02:54 AM

पक्षी धडकल्याने दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे पाटण्यात इमर्जन्सी लँडिंग

या घटनेनंतर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. घटनेचे गांभीर्य पाहून तत्परता दाखवण्यात आली आणि विमान पटनाला परत आणण्यात आले. यामुळे देशात आणखी एक विमान अपघात टळला.

पक्षी धडकल्याने दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे पाटण्यात इमर्जन्सी लँडिंग
Indigo Flight emergency landing

नवी दिल्ली: पक्षी धडकल्याने 175 प्रवाशांसह पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे पाटण्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानया घटनेनंतर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. घटनेचे गांभीर्य पाहून तत्परता दाखवण्यात आली आणि विमान पटनाला परत आणण्यात आले. यामुळे देशात आणखी एक विमान अपघात टळला. तळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 175 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी एअरलाइन्सकडून पर्यायी व्यवस्था केली जाईल.

हेही वाचा - राजस्थानमधील चुरूमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; 2 वैमानिकांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सकाळी पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात (उड्डाण क्रमांक IGO5009) तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर विमानाला पटनाच्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत नेण्यात आले. पक्षी धडकल्याने विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

हेही वाचा - गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! वडोदरा-आनंदला जोडणारा पूल कोसळला; 9 जणांचा मृत्यू

दरम्यान, पाटणा विमानतळाने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, भारतीय वेळेनुसार सकाळी 8:42 वाजता पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच विमानाला पक्ष्याची धडक बसल्याची तक्रार आली. तपासादरम्यान, धावपट्टीवर एक मृत पक्षी आढळला. लगेचचं अप्रोच कंट्रोल युनिटद्वारे विमानाला याची माहिती देखील देण्यात आली. अप्रोच कंट्रोल युनिटकडून एका इंजिनमध्ये कंपन झाल्यामुळे विमानाला पटनाला परतण्याची विनंती करण्यात आल्याचा संदेश मिळाला. स्थानिक स्टँड-बाय घोषित करण्यात आला आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 9:03 वाजता विमान रनवे 7 वर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.


सम्बन्धित सामग्री