Wednesday, August 20, 2025 03:56:31 PM

New Delhi Chief Minister Rekha Gupta : काय आहे रेखा गुप्ता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी? जाणून घेऊ..

रेखा गुप्ता यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा पराभव केला.

new delhi chief minister rekha gupta   काय आहे रेखा गुप्ता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेऊ

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत सत्ता कोणाकडे असेल हे आता निश्चित झाले आहे. भारतीय जनता पार्टीने दिल्लीची सत्ता रेखा गुप्ता यांच्याकडे हाती सोपवली आहे. आता रेखा गुप्ता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपाने ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनकर यांची नियुक्ती केली होती. रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघाच्या आमदार आहेत.

रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला.

हेही वाचा - Gyanesh Kumar Takes Charge As CEC: 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सक्रिय सदस्य

रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सक्रिय सदस्य आहेत. संघाच्या विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) माध्यमातून त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. 1994-95 मध्ये त्या दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या. 1995-96 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) सचिव झाल्या. 1996-97 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष झाल्या.

मुळच्या हरियाणातील, वडील दिल्लीत झाले स्थायिक
रेखा गुप्ता मुळच्या हरियाणातील जुलाना येथील आहेत. त्या दोन वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांची दिल्लीला बदली झाली आणि त्यानंतर त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले. रेखा गुप्ता यांचे वडील जय भगवान हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक होते. त्यांच्या आईचे नाव उर्मिला जिंदाल आहे त्या गृहिणी होत्या. रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता हे स्पेअर पार्ट्सचे व्यापारी आहेत. मुख्यमंत्री रेखा या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांच्या मुलाचे नाव निकुंज गुप्ता आणि मुलगी हर्षिता गुप्ता आहे.

रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री
रेखा गुप्ता या बनिया/वैश्य समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. बनिया समुदायाची गणना भाजपच्या मुख्य मतपेढीमध्ये केली जाते. त्यांचे नाव जाहीर करून भाजपने त्यांच्या मूळ मतदारांना मोठा संदेश दिला आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीची सूत्रे एका महिलेकडे सोपवून भाजपने देशभरातील महिलांना एक संदेशही दिला आहे. रेखा गुप्ता या मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करतात. रेखा गुप्ता दिल्लीतील शालीमार बाग येथून विजयी झाल्या आहेत, जो पूर्णपणे मध्यमवर्गीय परिसर आहे. भाजपच्या सर्वात मोठ्या समर्थकांमध्ये मध्यमवर्गाचाही समावेश आहे.

हेही वाचा - New Delhi Railway Station : चेंगराचेंगरीनंतर कडेकोट बंदोबस्त, लक्ष वेधून घेतेय लेकराला उराशी धरून कर्तव्य बजावणारी आई

विधानसभा निवडणुकीत भाजपाने आम आदमी पक्षाचा पराभव करून मोठा विजय मिळवला आणि यासह भाजप तब्बल 27 वर्षांनी पुन्हा सत्तेत आला. 70 जागांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 48 जागांवर विजय मिळाला तर 'आप'ला 22 जागांवरच समाधान मानावे लागलं. 


सम्बन्धित सामग्री