Monday, September 01, 2025 08:59:04 AM

'देशात मुस्लिमांविरुद्ध भेदभाव वाढत आहे म्हणून...'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांचे वादग्रस्त वक्तव्य

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना रॉबर्ट वड्रा म्हणाले, 'मला खूप वाईट वाटत आहे आणि या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल माझी तीव्र संवेदना आहे.

देशात मुस्लिमांविरुद्ध भेदभाव वाढत आहे म्हणून पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांचे वादग्रस्त वक्तव्य
Robert Vadra
Edited Image

नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. 'हा पंतप्रधानांसाठी एक संदेश आहे, कारण देशातील मुस्लिमांना अस्वस्थ वाटत आहे. देशात हिंदू-मुस्लिम संघर्ष सुरू आहे. त्यामुळे मुस्लिमांना अस्वस्थ वाटत आहे. म्हणूनच दहशतवाद्यांनी ओळखपत्र पाहून हत्या केल्या,' असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे. या संवेदनशील वेळी वाड्रा यांच्या या विधानाने सर्वांना धक्का बसला आहे. 

रॉबर्ट वाड्रा काय म्हणाले? 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना रॉबर्ट वड्रा म्हणाले, 'मला खूप वाईट वाटत आहे आणि या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल माझी तीव्र संवेदना आहे. आपल्या देशात, आपण पाहतो की हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलत आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना अस्वस्थ आणि त्रासदायक वाटते. जर तुम्ही या दहशतवादी कृत्याचे विश्लेषण केले तर, जर ते (दहशतवादी) लोकांच्या ओळखी पाहत असतील, तर ते असे का करत आहेत? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक फूट निर्माण झाली आहे. यामुळे अशा संघटनांना असे वाटेल की हिंदू सर्व मुस्लिमांसाठी समस्या निर्माण करत आहेत.'

हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना राज्य सरकार देणार 10 लाख रुपये नुकसानभरपाई

हा पंतप्रधानांना संदेश एक संदेश - रॉबर्ट वाड्रा 

रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे की, 'ओळख पाहून आणि नंतर एखाद्याला मारून टाकणे, हा पंतप्रधानांना संदेश आहे, कारण मुस्लिमांना कमकुवत वाटत आहेत. देशातील अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटत आहे.'  

हेही वाचा -  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईक 3.0 करणार का? नेटिझन्सकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला  - 

मंगळवारी दुपारी 2.30 वाजता पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी आजूबाजूच्या टेकड्यांमधून खाली आले आणि त्यांनी पर्यटकांना त्यांची ओळख विचारली. यानंतर त्यांनी महिला आणि मुलांना एका बाजूला आणि पुरुषांना दुसऱ्या बाजूला ठेवले. यानंतर दहशतवाद्यांनी एके 47 आणि इतर शस्त्रांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी सुमारे 5 मिनिटे गोळीबार सुरू ठेवला आणि त्यात 26 जणांचा मृत्यू झाला.
 


सम्बन्धित सामग्री