Thursday, August 21, 2025 05:41:52 AM

अहमदाबाद विमान अपघातातील 190 मृतदेहांची DNA ओळख पटली! आतापर्यंत 157 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द

आतापर्यंत 190 मृतदेहांची DNA ओळख पटली असून 157 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. विमान अपघातानंतर या दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांची ओळख पटवली जात आहे.

अहमदाबाद विमान अपघातातील 190 मृतदेहांची dna ओळख पटली आतापर्यंत 157 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द
Ahmedabad plane crash
Edited Image

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघात होऊन सात दिवस उलटले आहेत. अद्याप अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. ताज्या वृत्तानुसार, आतापर्यंत 190 मृतदेहांची DNA ओळख पटली असून 157 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. विमान अपघातानंतर या दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांची ओळख पटवली जात आहे. यासाठी दररोज डीएनए चाचणी करण्याचे काम सुरू आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी सांगितले की, आतापर्यंत 190 मृतांची डीएनए ओळख पटली आहे. त्याच वेळी 157 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. 

डीएनए जुळवण्याची प्रक्रिया सुरू - 

दरम्यान, विमान अपघातात आतापर्यंत ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही, त्यांच्यासाठी डीएनए जुळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 190 मृतांची डीएनए ओळख पटवण्यात आली आहे, त्यापैकी 157 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. उर्वरित 33 पैकी 5 मृतदेहांची डीएनए जुळवण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, 2 मृतदेह परदेशात पाठवण्यात आले असून 11 मृतदेह गुजरातबाहेरील इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहेत. 129 मृतदेह गुजरातमधील रस्त्याने त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले आहेत.

हेही वाचा - 'अत्यंत वाईट सेवा...'; सुप्रिया सुळेंची एअर इंडियाबद्दल विमान वाहतूक मंत्र्यांकडे तक्रार

विश्वासकुमार रमेश यांना डिस्चार्ज -  

दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातात केवळ एक प्रवासी वाचला होता. विश्वासकुमार रमेश, असं या प्रवाशाचं नाव आहे. सध्या त्यांची प्रकृती निरोगी असून त्याचे कुटुंबीय यूकेहून अहमदाबादला पोहोचले होते. मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तथापी, अपघातात गंभीरपणे भाजलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

हेही वाचा - एअर इंडियाच्या मागे लागली साडेसाती? विमानात पुन्हा बिघाड, रांचीला जाणारे विमान दिल्लीला परतले

जखमींपैकी 3 जणांचा मृत्यू -   

अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या 7 जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच इतर 12 जणांवर गुजरातच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताच्या पहिल्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 71 रुग्णांना दाखल करण्यात आले होते, त्यापैकी आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
 


सम्बन्धित सामग्री