Kia Engine Theft: कार उत्पादक कंपनी किआ इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. किआच्या प्लांटमधून 1008 इंजिन चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. या इंजिनांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. किआ इंडियाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांवर 3 वर्षात कार उत्पादक कंपनीच्या प्लांटमधून 1008 इंजिन चोरी केल्याचा आरोप आहे. यासाठी दोघांनीही भंगार विक्रेत्यांशी संगनमत करून हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे.
ऑडिटनंतर उघडकीस आलं प्रकरण -
या वर्षी मार्चमध्ये संपूर्ण वर्षाचे ऑडिट केले गेले तेव्हा चोरीचे प्रकरण उघडकीस आले. तथापि, कंपनीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. गेल्या 3 वर्षात किआ प्लांटमधून सुमारे 1008 इंजिन चोरीला गेले आहेत.
हेही वाचा - एनआयएकडून काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापेमारी
चोरी गेलेल्या इंजिनची किंमत -
प्राप्त माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत कारखान्यातून 1008 इंजिन चोरीला गेले आहेत, ज्याची किंमत सुमारे 19.74 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या चोरीमुळे किआच्या ऑपरेशन्स, भागधारकांवर आणि वर्कस्टेशन सुरक्षिततेवर विपरीत परिणाम झाला आहे. या वर्षी मार्चमध्ये, किआ इंडियाने आंध्र प्रदेश पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली आणि म्हटले की अंतर्गत नोंदींचा आढावा घेतल्यावर असे आढळून आले की त्यांच्या भागीदार कार कंपनी ह्युंदाईकडून मिळालेली इंजिने चोरीला गेली आहेत. संशयितांपैकी एक जण टीम लीडर होता आणि दुसरा इंजिन डिस्पॅच विभागात विभाग प्रमुख होता, जे बनावट पावत्या आणि गेट पास बनवून कारखान्यातून बेकायदेशीरपणे इंजिन बाहेर काढण्यात सहभागी होते.
हेही वाचा - बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारच्या अडचणी वाढल्या; उच्च न्यायालयाने बजावली नोटीस
आरोपींविरोधात गुन्हा दाखल -
इंजिन चोरीबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, गेल्या वर्षी जेव्हा कंपनीने त्यांच्या इन्व्हेंटरी व्यवस्थापन प्रक्रियेत सुधारणा केली तेव्हा त्यांना या चोरीची माहिती मिळाली. कंपनीने सुरुवातीला अंतर्गत चौकशी केली आणि चोरी उघडकीस आली त्याच वेळी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चोरीत सहभागी असलेल्या लोकांची माहिती मिळाली. चोरीची तक्रार दिल्यानंतर सुमारे 4 आठवड्यांनंतर, व्यवस्थापनाने प्लांट परिसरात सीसीटीव्ही फुटेजमधून चुकीची वाहने ये-जा करताना पाहिली. मार्चमध्ये सुमारे 940 इंजिन चोरीला गेले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.