Sunday, September 07, 2025 03:31:19 AM

Ajit Pawar in Pune Ganpati Visarjan 2025: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत अजित पवारांचा उत्साह, ढोल वादनाचा लुटला आनंद

राज्यभरात मोठ्या उत्साहात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी ढोल वाजवत सहभाग घेतला.

ajit pawar in pune ganpati visarjan 2025 पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत अजित पवारांचा उत्साह ढोल वादनाचा लुटला आनंद

पुणे: राज्यभरात मोठ्या उत्साहात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी ढोल वाजवत सहभाग घेतला. पुण्यातील मिरवणुकीदरम्यान त्यांनी ढोल ताशांच्या गजरात काही क्षण ठेका धरला. यानंतर उपस्थितांमध्येही उत्साह वाढलेला पाहायला मिळाला. 

आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पूजा केली. "दहा दिवस अगदी कळलेही नाहीत. भक्तिभाव आणि श्रद्धेत सगळे रंगून गेले. आता गणरायाच्या कृपेने सर्वांच्या शांततेसाठी व आनंदासाठी प्रार्थना केली," असे पवार म्हणाले.

 

हेही वाचा: Anant Chathurti 2025 : ढोल-ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतीला निरोप

यंदाचं हे गणेश विसर्जन सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन पार पडावं, यासाठी त्या त्या भागातील प्रशासनानं, मंडळांनी नीट खबरदारी घ्यावी, असं आवाहन देखील पवारांनी केलं आहे.


सम्बन्धित सामग्री