सध्या संपूर्ण देशभरात गणपती विसर्जनाची धूम बघायला मिळत आहे. 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आता जवळ आली आहे. गणेश चतुर्थीपासून ते दहा दिवसांपर्यंत भाविक विघ्नहर्ता यांची पूजा करतात आणि अनंत चतुर्दशीला त्यांना निरोप देतात. गणेश विसर्जनाचे सर्वात प्रमुख पौराणिक कारण महाभारताच्या रचनेशी संबंधित आहे, ते नेमके काय आहे? याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
पुराण कथेनुसार, गणरायांचे भाऊ कार्तिकेय यांच्याकडे काही दिवस राहण्यासाठी गेले होते. यादरम्याने गणरायांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली. 10 दिवस राहिल्यानंतर गणराया तिथून निघाले त्याचवेळी भगवान कार्तिकेय यांच्यासह अनेकजण भावूक झाले. त्याचवेळी त्यांना पुढील वर्षी परत येण्यासाठी निमंत्रण दिले. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या 10 व्या दिवशी गणेशजींचा विसर्जन सोहळा साजरा केला जातो असे मानले जाते.
हेही वाचा - Ganesh Idol Ritual : गणेश चतुर्थीला स्थापन केलेली मूर्ती कायमस्वरूपी घरात ठेवू शकतो का? शास्त्र काय सांगतं, जाणून घ्या
त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथानुसार, महर्षी वेद व्यासांनी सलग 10 दिवस गणरायाला महाभारताची कथा सांगितली. 10 दिवसांनंतर, जेव्हा वेद व्यासांनी गणेशाला स्पर्श केला, तेव्हा त्यांचे शरीराचे तापमान वाढलेले होते. यानंतर महर्षी वेद व्यास यांनी त्यांना एका तलावावर नेले आणि येथे स्नान करून त्यांच्या शरीराचे तापमान थंड केले. त्यानंतर गणेश प्रतिष्ठापना आणि गणपती विसर्जनाची प्रथा सुरू झाली असे मानले जाते.
हेही वाचा - Ganesh Visarjan 2025: कडक बंदोबस्तामध्ये 69 फूट उंच 'खैरताबाद बडा गणेश' विसर्जन सोहळा
वैज्ञानिक दृष्टीकोन
अनेकदा विसर्जनाबद्दल वैज्ञानिक दृष्टीकोनदेखील मांडला जातो. आलेल्या प्रत्येकालाच जायचे आहे. जग हे नश्वर आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पालादेखील मनोभावे निरोप दिला जातो. गणेश विसर्जनादरम्याने गणेश मूर्तीसोबत हळदीचे कुंकू देखील पाण्यात विसर्जित केले जाते. हळदीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुण आहे, ते पाणी शुद्ध करते. यासोबतच, दुर्वा, चंदन, धूप, फुले देखील वातावरण स्वच्छ करतात. परिणामी पावसाळ्यात वाहणाऱ्या नद्या, तलाव, तलावांमध्ये साचलेले पाणी शुद्ध होते आणि मासे, सरडे आणि इतर सजीव प्राण्यांना आराम मिळतो.