Saturday, September 06, 2025 10:42:52 PM

AI Love Trap : Deepfake रोमान्स स्कॅमपासून सावध रहा! कोट्यवधी लुबाडणारे नवे मायाजाल पसरलेय

प्रेमाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे - आणि तेही हाय-टेक पद्धतींनी. म्हणजेच आता AI चा भामट्यांकडून होणारा वापर हा एक धोकादायक सापळा बनले आहे.

ai love trap  deepfake रोमान्स स्कॅमपासून सावध रहा कोट्यवधी लुबाडणारे नवे मायाजाल पसरलेय

Deepfake Romance Scam : एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेमाच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. हा एक धोकादायक सापळा बनला आहे. ऑनलाइन डेटिंगमुळे जोडीदार शोधणे सोपे झाले आहे. अनेक लोक डेटिंग अॅपचा वापर करत आहेत. परंतु, आता एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. 

आता AI टेक्नॉलॉजीचा वापर फसवणुकीसाठी
एका अहवालानुसार, 2025 पर्यंत जगभरात होणाऱ्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त ऑनलाइन फसवणूक "रोमान्स स्कॅम" असतील. याचा अर्थ असा की, प्रेमाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे - आणि तेही हाय-टेक पद्धतींनी. म्हणजेच आता AI चा भामट्यांकडून होणारा वापर हा एक धोकादायक सापळा बनले आहे. 

डीपफेक रोमान्स स्कॅम कसा होतो?
"माफ करा, हा मेसेज चुकून पाठवला गेला" अशा प्रकारच्या संदेशाने याची सुरूवात होते. मग संभाषण सुरू होते - चॅटिंग, व्हिडिओ कॉल, गुलुगुलु बोलणे, मोहात पाडले जाणे अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होतात. AI च्या मदतीने तयार केलेले खोटे चेहरे, आवाज आणि व्हिडिओ वापरले जातात, जे खरे वाटतात. मग हळूहळू, विश्वास निर्माण केला जातो आणि यानंतर पैशाची मागणी केली जाते किंवा एकांत ठिकाणी भेटण्याची चर्चा केली जाते.

हेही वाचा - Pan Card Fake Loan: तुमच्या नावावर कुणी फसवे लोन तर घेतले नाही ना? जाणून घ्या तपासण्याची पद्धत

भारतात काय परिस्थिती आहे?
भारतातील महानगरांमध्ये अशा प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2024 मध्ये दररोज सुमारे 60 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली. एका वर्षात एकूण 22,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. बळी पडलेल्यांपैकी बहुतेक 25 वर्षांखालील तरुण आहेत. घोटाळेबाज अनेकदा क्रिप्टोकरन्सीमध्ये (जसे की बिटकॉइन) पैसे मागतात, ज्यामुळे त्यांना पकडणे कठीण होते.

डीपफेक व्हिडिओ ओळखणे का कठीण आहे?
हे व्हिडिओ इतके खरे दिसतात की, सामान्य व्हिडिओमध्ये ते ओळखणे कठीण होते. एआयने तयार केलेले चेहरे पापण्यांचे डोळे मिचकावणे, हावभाव आणि बोलण्याच्या शैलीची बेमालूम नक्कल करतात. एका ब्रिटिश अहवालात असे म्हटले आहे की, 2023 मध्ये 5 लाख घोटाळे झाले आणि 2025 पर्यंत ही संख्या 80 लाखांपर्यंत पोहोचू शकते.

काय नुकसान होऊ शकते?
- भावनिक धक्का - ज्यामुळे नैराश्य येऊ शकते.
- पैशांचे नुकसान - लोक लहान-मोठ्या रकमेचे नुकसान करतात.
- वैयक्तिक डेटा चोरी - फोटो, ओळख आणि बँक तपशील लीक होऊ शकतात.
- देशाच्या सुरक्षेला धोका - संवेदनशील माहिती लीक होऊ शकते.

डीपफेक आणि रोमान्स स्कॅम कसे टाळायचे?
- आवश्यक तपासणी न करता कोणावरही विश्वास ठेवू नका.
- जर फोटो आणि व्हिडिओमध्ये काही चुकीचे दिसत असेल तर सावधगिरी बाळगा.
- जर कोणी भेटण्यात दिरंगाई करत असेल किंवा वारंवार पैसे मागत असेल तर ताबडतोब सावधगिरी बाळगा.
- कधीही पैसे पाठवू नका - विशेषतः जेव्हा कोणी फक्त ऑनलाइन भेटले असेल, त्या व्यक्तीशी चांगली ओळख नसेल तर मुळीच दयाबुद्धीने किंवा मोहात पडून पैसे पाठवू नका.
- जर भेटणे आवश्यक असेल तर - फक्त सार्वजनिक ठिकाणी भेटा.
- जर काही संशयास्पद असेल तर सायबर पोलिसांना कळवा.

हेही वाचा - ChatGPT Privacy Risks: ChatGPT वापरताना 'या' 5 गोष्टी कधीच शेअर करू नयेत; अन्यथा मोठ्या अडचणीत सापडू शकता

कोणते देश प्रभावित आहेत?
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, तैवान, हाँगकाँग आणि थायलंडसारखे देश या घोटाळ्याच्या विळख्यात आहेत. पोलिसांच्या सायबर सेलकडेही अनेक तक्रारी दाखल होत आहेत.

आजकाल प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक करणे हा भामटेगिरीतला एक नवीन ट्रेंड बनला आहे. एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्कॅमर सामान्य लोकांना फसवत आहेत. म्हणून, स्वतः सावधगिरी बाळगणे आणि इतरांनाही सावधगिरी बाळगण्यास सांगणे महत्वाचे आहे. जर काही संशयास्पद वाटत असेल तर, नाही म्हणण्यास अजिबात संकोच करू नका. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होऊ नये ही, प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. कारण, यात स्वतःची भूमिका आधी आणि इतरांची किंवा पोलिसांनी भूमिका नंतर येते.


सम्बन्धित सामग्री