Sunday, September 07, 2025 02:20:13 PM

BSP President Mayawati: मायावतींचा मोठा निर्णय! आकाश आनंद यांच्यानंतर त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ बसपामध्ये परतले

काही महिन्यांपूर्वी पक्षविरोधी कारवायांसाठी अशोक सिद्धार्थ यांना बसपातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, त्यांनी पक्ष प्रमुख मायावतींकडे सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली.

bsp president mayawati मायावतींचा मोठा निर्णय आकाश आनंद यांच्यानंतर त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ बसपामध्ये परतले

BSP President Mayawati Forgave Ashok Siddharth: बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावतींनी पक्ष आणि डॉ. भीमराव आंबेडकरांच्या चळवळीच्या हितासाठी माजी राज्यसभा सदस्य अशोक सिद्धार्थ यांना पक्षात पुन्हा सामील केले आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षविरोधी कारवायांसाठी अशोक सिद्धार्थ यांना बसपातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, त्यांनी पक्ष प्रमुख मायावतींकडे सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली.

अशोक सिद्धार्थ यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'मी भविष्यात कधीही अशी चूक करणार नाही आणि पक्षाच्या शिस्तीत व मायावतींच्या मार्गदर्शनाखाली काम करेन.' त्यांनी पक्षातील इतर चुकीच्या सदस्यांना परत घेण्याची शिफारस करणार नाही अशीही हमी दिली.

हेही वाचा - Amol Mitkari: 'माझी वैयक्तिक भूमिका...', अजित पवारांच्या व्हायरल कॉलवर अमोल मिटकरींची दिलगिरी

यापूर्वी मायावतींनी त्यांच्या पुतण्या आकाश आनंद यांची बसपातून हकालपट्टी रद्द केली होती आणि त्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान दिले होते. अशोक सिद्धार्थ यांना पक्षात पुन्हा सामील करून घेणे म्हणजे बसपाच्या हितासाठी आणि दलित तसेच उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची संधी देणे आहे, असं मायावतींनी म्हटलं होतं. 

हेही वाचा - Anjali Damania On Amol Mitkari : 'हा काय फालतूपणा...' अमोल मिटकरी यांच्या पत्रावर अंजली दमानिया यांचा संताप

बसप प्रमुख मायावती यांनी सांगितले की, अशोक सिद्धार्थ यांचे सार्वजनिक माफी मागणे आणि पक्षात परत येण्याची इच्छा लक्षात घेऊन त्यांची हकालपट्टी रद्द केली गेली आहे. आता अशोक सिद्धार्थ पुन्हा पक्षाचे निष्ठावंत सदस्य म्हणून कार्य करतील, जेणेकरून बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकरांच्या चळवळीला अधिक बळ मिळेल. मायावतींचा हा निर्णय पक्षाच्या एकात्मतेसाठी आणि समाजातील शोषित घटकांच्या हितासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.


सम्बन्धित सामग्री