Punjab Floods: पंजाबमधील बहुतेक जिल्हे सध्या पूरामुळे गंभीरपणे प्रभावित आहेत. या परिस्थितीत स्थानिक लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी पूरग्रस्त राज्यांना भेट देणार आहेत. त्यांनी सर्वप्रथम पंजाब राज्याचा दौरा करणार असून, ते गुरुदासपूर येथे थेट प्रभावित लोकांची भेट घेणार आहेत.
पंजाब भाजपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधानांच्या भेटीची माहिती दिली आहे. पक्षाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी पंजाबमधील गुरुदासपूरला येत आहेत. ते पूरग्रस्त बंधू-भगिनींना आणि शेतकऱ्यांना थेट भेटतील, त्यांचे दुःख वाटून घेतील आणि पीडितांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलतील.'
हेही वाचा - मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज पाठवणारा अश्विनी कुमार कोण आहे?, जाणून घ्या..
पंजाब व्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये देखील पूरग्रस्त क्षेत्रांमध्ये आहेत. सूत्रांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यापैकी काही भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतील. पंतप्रधानांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा काही राज्य सरकारांनी केंद्राकडून आर्थिक मदत मागितली आहे.
हेही वाचा - Ropeway Breaks In Gujarat: गुजरातमधील पंचमहलमध्ये रोपवे तुटला; 6 जणांचा मृत्यू
याआधी गुरुवारी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन केंद्रीय पथके पंजाबला पाठवले जात आहेत. ते केंद्राला अहवाल सादर करतील. चौहान म्हणाले की, देश आणि मानवतेची सेवा करण्यात पंजाबी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.