Sunday, September 07, 2025 05:49:16 PM

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ad campaign : मुख्यमंत्र्यासाठी कोट्यवधी खर्चून जाहिरात, रोहित पवारांनी केली संशय व्यक्त; "जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री..."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींबाबत संशय उपस्थित केला जात असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही जाहिरात सरकारमधील एक मंत्र्याने दिली आहे असा दावा केला आहे.

rohit pawar on devendra fadnavis ad campaign  मुख्यमंत्र्यासाठी कोट्यवधी खर्चून जाहिरात रोहित पवारांनी केली संशय व्यक्त quotजाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले हा मंत्रीquot

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ad campaign: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत आंदोलनासाठी आला होता. यावेळी मराठा आंदोलकांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तर काही मागण्यांवर तोडगा काढून त्यांना परत पाठवले आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात जीआर काढून जरांगेंचे उपोषण थांबवले. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याचा दावा सरकारने केला आहे.

यानंतर राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन आणि मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावून देवाभाऊ हे कॅम्पेन राबवण्यात आलं. हे कॅम्पेन नेमकं कोणी केलं, कोट्यवधी खर्च करुन वृत्तपत्रांमध्ये जाहिरात कोणी दिली, याबद्दल अद्याप समजलेलं नाही. या जाहिरातींमध्ये जाहिरातदाराचं नाव देखील नमूद केलेलं नाही. 

हेही वाचा: Ajit Pawar in Pune Ganpati Visarjan 2025: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत अजित पवारांचा उत्साह, ढोल वादनाचा लुटला आनंद

मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर रोहित पवारांचा संशय 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींबाबत संशय उपस्थित केला जात असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही जाहिरात सरकारमधील एक मंत्र्याने दिली आहे असा दावा केला आहे. तसेच हा मंत्री भाजपाचा नसून त्यांच्या मित्रपक्षाचा असल्याचंही रोहित पवारांनी सांगितलं आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे.    

काय म्हणाले रोहित पवार?

"एकीकडे राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता. या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे.

मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील."


सम्बन्धित सामग्री