मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यासह, अधूनमधून वरूणराजाचे आगमन होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगालमधील उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत पावसाचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा: Mirzapur Webseries : 'मिर्झापूर' मध्ये आता बबलू पंडितची जागा घेणार हा अभिनेता ; कशी असेल आताची टीम
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा रोड परिसरात पावसाने थैमान घातले आहे. पुढील काही तासांत मुंबईत जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह, पुण्यातही रिमझिम पावसाची सुरूवात झाली आहे. यामुळे, हवामान खात्याने नागरिकांना आवाहन केले आहे की, 'राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे'.
रेड अलर्ट: मुंबई, पुणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येलो अलर्ट: हवामान खात्याने, नाशिक, धुळे, हिंगोली, लातूर, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
यासह, कोल्हापूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने राजस्थान आणि गुजरातला रेड अलर्ट दिला आहे. तसेच, महाराष्ट्रातील किनारपट्टीला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासह, हवामान खात्याने जम्मू काश्मिर, महाराष्ट्रातील बहुतांश भागात, छत्तीसगढ, तमिळनाडू आणि इतर राज्यात येलो अलर्ट दिला आहे. गुजरात राज्यातील बनासकांठा, कच्छ, पाटन, मोरबी या शहरासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे.