Sunday, September 07, 2025 09:05:09 PM

Eid Milad-un-Nabi Holiday: मुंबईत 8 सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी; बँका-शाळा-शेअर बाजार बंद राहणार का? जाणून घ्या

मुंबईत 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी देण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आणि ईद मेळावा एकत्र येऊन कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

eid milad-un-nabi holiday मुंबईत 8 सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी बँका-शाळा-शेअर बाजार बंद राहणार का जाणून घ्या

Eid Milad-un-Nabi Holiday: यावेळी मुंबईत 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी देण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आणि ईद मेळावा एकत्र येऊन कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारने बुधवारी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली. यानुसार सोमवारी मुंबई आणि उपनगरातील सर्व सरकारी कार्यालये व बँकिंग कामकाज बंद राहणार आहे.

शेअर बाजार सुरु राहील

सुट्टीची घोषणा होताच गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की बीएसई व एनएसई सोमवारी बंद राहतील का? मात्र बीएसईच्या सुट्टीच्या यादीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये कोणतीही ट्रेडिंग सुट्टी नाही. त्यामुळे बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहील.

हेही वाचा - Food Delivery Became Expensive: Zomato आणि Swiggy वरून जेवण ऑर्डर करणे महागले; मॅजिकपिन देत आहे सर्वात स्वस्त फूड डिलिव्हरी

बँका आणि शाळा बंद

मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी बँका 8 सप्टेंबर रोजी बंद राहतील. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आर्थिक कामांचे नियोजन वेळेत करणे गरजेचे आहे. मुंबई व आसपासच्या भागातील शाळा देखील सोमवारी बंद राहतील. मूळ नियोजनानुसार 5 सप्टेंबरची सुट्टी आता पुढे ढकलून 8 सप्टेंबरला देण्यात आली आहे.

हेही वाचा - UPI Payment Update: डिजिटल व्यवहारात मोठा बदल! NPCI ने जाहीर केले नवीन नियम; जाणून घ्या

ईद-ए-मिलाद म्हणजे काय?

ईद-ए-मिलाद, ज्याला ईद मिलाद-उन-नबी असेही म्हणतात, हा पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मुस्लिम समाजात विशेषतः सूफी आणि बरेलवी पंथामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मिरवणुका, नाथ पठण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


सम्बन्धित सामग्री