मुंबई: मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्दव ठाकरे हे एकत्र आले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात या दोघांची सुद्धा भाषणं झाली. त्यावेळी या दोघांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना दसरा मेळाव्यात बोलवू शकतात अशी शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मेळाव्यात बोलावणार का?
यंदा 2 ऑक्टोबरला दसरा आहे. या दिवशी ऐतिहासिक घडामोड होण्याची शक्यता आहे. ही घडामोड म्हणजे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यात बोलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे दसऱ्याला चांगली बातमी मिळेल. राज ठाकरे यांना कदाचित आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते असे वक्तव्य सचिन अहिर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.
हेही वाचा: Rohit Pawar on Devendra Fadnavis Ad campaign : मुख्यमंत्र्यासाठी कोट्यवधी खर्चून जाहिरात, रोहित पवारांनी केली संशय व्यक्त; "जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री..."
काय म्हणाले सचिन अहिर?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही केवळ दोन्ही पक्षांची गरज नाही तर ते राज्यासाठी गरजेचे आहे. ही मराठी लोकांच्या मनातील भावना आहे. नुकताच गणेशोत्सव समाप्त झाला असून पितृपक्ष सुरु होत आहे. त्यामुळे आता दसऱ्याला चांगली बातमी मिळेल, अशी आशा आहे. दसरा मेळाव्यात आमचे नेते सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला कसे समोरे जायचे याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले आहे. दसरा मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का माहिती नाही. परंतु आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो, ही शक्यताा नााकारता येत नाही. आमच्याप्रमाणेच त्यांचाही मेळावा असतो. त्यामुळे दोघे एकमेकांना आमंत्रित करु शकतात असेही अहिर यांनी म्हटले आहे.