Sunday, September 07, 2025 08:21:13 PM

Lalbaugcha Raja Visarjan : बाप्प्पा काही चुकलं असेल तर...! 30 तास झाले, लालबागच्या राजाचे विसर्जन अजूनही रखडलेलंच

लालबागच्या राजाचे विसर्जन कधी होणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

lalbaugcha raja visarjan  बाप्प्पा काही चुकलं असेल तर 30 तास झाले लालबागच्या राजाचे विसर्जन अजूनही रखडलेलंच

बाप्प्पा काही चुकलं असेल तर माफ कर...! सध्या अशी अवस्था आज लालबाग मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. 30 तास उलटून गेले तरीही लाडक्या लालबागच्या राजाचे विसर्जन झाले नाही. लालबागच्या राजाच्या  विसर्जनासाठी  खास  गुजरातवरून तराफा मागवला. मात्र समुद्रात भरती आल्यामुळे राजा तराफ्यावर विराजमान होऊ शकला नाही. त्यामुळे आता लालबागच्या राजाचे विसर्जन कधी होणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.  

रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर आगमन झाले. दाखल झाल्यानंतर दोन तासांच्या आत विसर्जन होते. मात्र नेमक्या त्याच काळात समुद्राला भरती आणि आणि त्यामुळे विसर्जन थांबवावे लागले. दरम्यान विसर्जनासाठी जो तराफा आणला गेला होता त्याची उंची जास्त होती. अशातच भरती आल्यामुळे बाप्पाला तराफ्यावर विराजमान करता आले नाही.त्यामुळे आता गेल्या अनेक तासांपासून लालबागचा राजा पाण्यात अडकून पडला आहे.  

हेही वाचा - Ganesh Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर; अखेर समोर आलं खरं कारण 

याचदरम्यान गणपतीचा पाट जड झाल्याने लालबागचा राजाची मूर्ती जागेवरुन हलत नव्हती. त्याचवेळी दुपारी गणेश गल्लीचे कार्यकर्ते लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मदतीला धावून आले. या सगळ्यांनी मिळून लालबागचा राजाचा पाट हलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लालबागचा राजाचा पाट हलला त्यामुळे सर्वानाच हायसे वाटले. 

हेही वाचा - Rain Forecast : हवामान खात्याने वर्तवला अंदाज; राज्यातील 'या' 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा 

गिरगाव चौपाटीवर अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर स्थानिक कोळी बांधवांनी पुढाकार घेतला. दीड तासाहून अधिक वेळ त्यांनी समुद्राच्या लाटांवर नियंत्रण ठेवत मूर्ती आणि तराफा सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु समुद्राचा जोर इतका प्रखर होता की त्यांचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरत होते. अखेर भरती ओसरल्यानंतरच विसर्जन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लालबागचा राजा केवळ एक मूर्ती नाही, तर मुंबईकरांच्या श्रद्धेचं, उत्साहाचं आणि एकतेचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही त्याचा निरोप हा अविस्मरणीय ठरणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री