Sunday, September 07, 2025 05:38:00 PM

AC Vande Metro Local: मुंबईला मिळणार 2,856 वंदे मेट्रो स्टाईल AC लोकल गाड्या; MRVC ने काढली निविदा

या निविदेत गाड्यांच्या दीर्घकालीन देखभालीचाही समावेश असेल. हे डबे 12, 15 आणि 18 डब्यांच्या रचनेचे असतील. सध्या मुंबईतील बहुतेक लोकल्स 12 डब्यांच्या असतात, तर 15 डब्यांच्या फेऱ्या मर्यादित आहेत.

ac vande metro local मुंबईला मिळणार 2856 वंदे मेट्रो स्टाईल ac लोकल गाड्या mrvc ने काढली निविदा

AC Vande Metro Local: मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणासाठी मोठे पाऊल उचलत मुंबई रेल्वे विकास महामंडळ लि. (एमआरव्हीसी) ने तब्बल 2,856 पूर्ण वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदीसाठी निविदा जाहीर केली आहे. या निविदेत गाड्यांच्या दीर्घकालीन देखभालीचाही समावेश असेल. हे डबे 12, 15 आणि 18 डब्यांच्या रचनेचे असतील. सध्या मुंबईतील बहुतेक लोकल्स 12 डब्यांच्या असतात, तर 15 डब्यांच्या फेऱ्या मर्यादित आहेत. भविष्यातील गर्दी आणि वाढत्या मागणीसाठी 15 आणि 18 डब्यांचे रॅक सुरू करण्याची योजना आहे.

MUTP फेज III आणि IIIA अंतर्गत 6 सप्टेंबर 2025 रोजी अपलोड झालेल्या या निविदेनुसार, गाड्यांसोबतच पुढील 35 वर्षांच्या देखभालीची जबाबदारी निविदा विजेत्याकडे असेल. यासाठी मध्य रेल्वेवरील भीवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथे दोन अत्याधुनिक डिपो उभारले जातील. निविदा सादरीकरण 8 डिसेंबरपासून सुरू होईल आणि उघडण्याची तारीख 22 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. ही संपूर्ण खरेदी ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार केली जाणार आहे.

हेही वाचा - Indian Railways: प्रवाशांसाठी सुवर्ण संधी; दिवाळी सणासाठी मुंबई-पुणेसह राज्यभरात 944 विशेष रेल्वे गाड्या, आताच तिकिट बुक करा

वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांची वैशिष्ट्ये:

पूर्ण वातानुकूलित, वेस्टिब्यूल्ड रॅक
स्वयंचलित दरवाजे बंद प्रणाली
जास्त त्वरण व ब्रेकिंग क्षमता
आधुनिक आतील सजावट, गादीदार आसन, मोबाइल चार्जिंग व माहिती प्रणाली
130 किमी/तास वेग क्षमता
उच्च क्षमतेचे एचव्हीएसी
जागतिक दर्जाच्या सुरक्षा प्रणाली

हेही वाचा - Weather Update: आज मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पालघरसह 9 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

दरम्यान, एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास सोपार वाडेकर यांनी सांगितले की, 'ही खरेदी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेला भविष्याभिमुख बनवेल. लांब व सुरक्षित रॅक, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवासी गर्दी कमी होईल तसेच प्रवाशांची सुरक्षा व सोय सुनिश्चित केली जाईल.' 


सम्बन्धित सामग्री