Food Delivery Became Expensive: भारतामध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना आता जास्त खर्च करावा लागणार आहे. सणासुदीच्या हंगामापूर्वी झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन या तीन प्रमुख फूड डिलिव्हरी कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्म फी वाढवल्या आहेत. त्यात भर म्हणून 22 सप्टेंबरपासून डिलिव्हरी शुल्कावर 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे.
कोण किती शुल्क आकारत आहे?
स्विगीने निवडक शहरांमध्ये 15 रुपये (जीएसटीसह) प्लॅटफॉर्म फी आकारायला सुरुवात केली आहे. तथापी, झोमॅटोने आपले शुल्क 12.50 रुपये (जीएसटी वगळता) केले आहे. याशिवाय, मॅजिकपिन, तिसऱ्या क्रमांकाची सेवा देणारी कंपनी असून या कंपनीने आपली फी 10 रुपये प्रति ऑर्डर अशी केली आहे.
हेही वाचा - UPI Payment Update: डिजिटल व्यवहारात मोठा बदल! NPCI ने जाहीर केले नवीन नियम; जाणून घ्या
ग्राहकांवर किती भार येईल?
22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या 18 टक्के जीएसटीमुळे झोमॅटोच्या ग्राहकांना प्रति ऑर्डर अंदाजे 2 रुपये जास्त द्यावे लागतील. तसेच स्विगीच्या ग्राहकांसाठी हा अतिरिक्त भार सुमारे 2.6 रुपये असेल. तथापी, मॅजिकपिनने मात्र स्पष्ट केले की ते आधीपासूनच जीएसटी भरत असल्यामुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त परिणाम होणार नाही.
हेही वाचा - Health Insurance : GST बदलांचा आरोग्य विम्यावर परिणाम फायद्याचा की तोट्याचा?
मॅजिकपिनचा दावा; सर्वात स्वस्त सेवा-
मॅजिकपिनच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या खर्चाच्या रचनेवर जीएसटी वाढीचा परिणाम होत नाही. त्यामुळे, प्लॅटफॉर्म फी 10 रुपये प्रति ऑर्डरच राहणार असून ती झोमॅटो आणि स्विगीपेक्षा कमी आहे. अन्न वितरण कंपन्यांसाठी प्लॅटफॉर्म शुल्क हा एक नवीन महसूल स्रोत ठरत आहे. वाढत्या इंधन खर्च, डिलिव्हरी पार्टनरच्या फी आणि ऑपरेशनल खर्चामुळे कंपन्या हे शुल्क वाढवत आहेत.