Wednesday, August 20, 2025 03:01:07 PM

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; सोने प्रतितोळा 95 हजार 996 रुपयांवर

शुक्रवारी, सोन्याच्या किमती पुन्हा एकदा नवीन उच्चांकावर पोहोचल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि सोने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शुक्रवारी, सोने प्रतितोळा तब्बल 95 हजार 996 रुपये आकड्यापर्यंत पोहोचले.

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सोने प्रतितोळा 95 हजार 996 रुपयांवर

जळगाव: शुक्रवारी, सोन्याच्या किमती पुन्हा एकदा नवीन उच्चांकावर पोहोचल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि सोने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शुक्रवारी, सोने प्रतितोळा तब्बल 95 हजार 996 रुपये या आकड्यापर्यंत पोहोचले आहे. परंतु, गुरुवारी हा दर 94 हजार 039 रुपये होता. अवघ्या 24 तासांत तब्बल 1 हजार 957 रुपयांची वाढ झाल्यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली.

गुढीपाडव्याच्या काळात सोन्याचा दर 94 हजार 348 रुपये प्रति तोळा एवढा उच्चांक गाठला होता. मात्र, 8 एप्रिलपर्यंत सोन्याचे दर तब्बल 2 हजार 884 रुपयांनी घसरले होते. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे, काही काळासाठी ग्राहकांमध्ये थोडं का होईना पण दिलासा निर्माण झाला होता. मात्र, ते क्षणिक सुख होते. त्यानंतर, सलग काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढतच गेले आणि शुक्रवारी तब्बल 4 हजार 532 रुपयांची एकूण वाढ नोंदविण्यात आली.

अमेरिकेने वाढवलेले टॅरीफ कर:

नुकताच, अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वस्तूंवर टॅरीफ कर लादल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोने आणि चांदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेली घट ही त्या अंदाजाला पुष्टी देणारी वाटत होती. ज्यामुळे 'सोने आता स्वस्त होईल' अशी भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, बाजाराने सोने आणि चांदी यांच्या किमतींना नव्या शिखरावर नेले आहे.

ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका:

सध्या सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे, सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जरी दिलासा मिळत असला तरी सुद्धा ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी मात्र सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ज्यामुळे, सराफ बाजार जवळपास ठप्प झाली असून, अनेक दुकानदार या मंदीमुळे चिंतेत आहेत.

सराफांनी व्यक्त केलेल्या भावना:

सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले, 'गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया यांसारख्या सणांच्या काळात सोने खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. मात्र अशा वेळीच दर वाढल्यामुळे सोने किंवा चांदीच्या खरेदीसाठी ग्राहक फक्त विचारपूस करून परत जात आहेत. जरी गुंतवणूकदारांसाठी ही वेळ फायदेशीर असली, तरी व्यवहार ठप्प होणे आमच्यासाठी मोठी अडचण आहे'.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरात वाढ:

यादरम्यान, चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे, सोन्याबरोबरच चांदी खरेदी करणाऱ्यांनाही चांगलाच फटका बसला आहे.


सम्बन्धित सामग्री