Dearness Allowance Hike: देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई मदत (DR) मध्ये 2% वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या ताज्या वाढीनंतर, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांपर्यंत वाढेल. सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारावर 53 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. ही माहिती देताना केंद्रीय अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 1 जानेवारी 2025 पासून 55 टक्के महागाई भत्ता लागू होईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला -
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी खूश आहेत. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के होईल. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ केली आहे. केंद्राने आठवा वेतन आयोगही स्थापन केला असून नवीन वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो.
हेही वाचा - Hurun Global Rich List: मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर! एकूण संपत्तीत झाली 'इतकी' घट
48.66 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा -
सध्याची महागाई लक्षात घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ही वाढ मंजूर केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशभरातील सुमारे 48.66 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 66.55 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.
हेही वाचा - मधुमेहापासून कर्करोगापर्यंतची आवश्यक औषधे महागणार! रुग्णांना सहन करावे लागणार मोठे नुकसान
किती वाढ होणार?
महागाई भत्त्यात वाढ केल्याने कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून मूळ पगारासह वाढलेला महागाई भत्ता लागू मानला जाईल. जर एखाद्याचा मूळ पगार 50 हजार रुपये असेल, तर सध्या त्याला 53 टक्के महागाई भत्ता नुसार 26500 रुपये महागाई भत्ता मिळत होता, परंतु आता 2 टक्के वाढीसह, त्याला 55 टक्के महागाई भत्ता नुसार 27500 रुपये महागाई भत्ता मिळेल. महागाई भत्ता एक हजार रुपयांनी वाढेल.