नवी दिल्ली: जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारने आता सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची अर्जित रजा घेण्याची परवानगी दिली आहे, तीही कोणताही पगार कपात न करता! राज्यसभेत कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सेवा (रजा) नियम 1972 नुसार, कर्मचार्यांना आधीच विविध प्रकारच्या रजा मिळतात. मात्र यामध्ये आता वृद्ध पालकांची सेवा करण्यासाठी 30 दिवसांची अर्जित रजा घेता येईल, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा -प्रौढ कंटेंटवर सरकारचा लगाम! उल्लू, ALTT सह 20 अॅप्सवर बंदी
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ही रजा खास किंवा वेगळी ‘विशेष रजा’ नसून कर्मचाऱ्याच्या अर्जित रजेचा एक भाग म्हणून मिळणार आहे. ही सुविधा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य आणि सेवेसाठी समर्पित वेळ देण्यास मदत करेल. याआधीही कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची अर्जित रजा मिळायची. परंतु, आता आता सरकारने त्याच्या वापराबाबत अधिक लवचिकता दाखवली आहे.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या 112 वैमानिकांनी घेतली होती आजारी रजा
या रजांचा उपयोग कोणत्याही दीर्घकाळच्या वैयक्तिक गरजांसाठी केला जाऊ शकतो. उदा, आजारपण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, पालक सेवा इ. सरकारचे हे धोरण सर्व केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर लागू आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अशीच योजना असेल की नाही, हे त्या त्या राज्य सरकारच्या नियमांवर अवलंबून असेल.