Not of Standard Quality medicines
Edited Image
Not of Standard Quality Medicines: आपण आजारी पडल्यानंतर औषध घेतो. परंतु, आपण घेत असलेलं औषधचं जर चुकीचे किंवा मानक दर्जाचे नसलेले असेल तर यांचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने जानेवारी 2025 साठी 145 औषधे आणि फॉर्म्युलेशनच्या निवडक बॅचेसना 'मानक दर्जाचे नसलेले' (Not of Standard Quality – NSQ) म्हणून सूचीबद्ध केले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, अॅलर्जी आणि मळमळ यासारख्या आजारांसाठी औषधे समाविष्ट आहेत. या 145 NSQ औषधांपैकी 52 औषधांची चाचणी केंद्रीय औषध प्रयोगशाळांनी तर इतर 93 औषधांची चाचणी राज्य औषध चाचणी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली. NSQ औषधं म्हणजे अशी औषधे जी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करत नाहीत.
मानक दर्जाचे नसलेले औषधे -
यामध्ये ग्लेनमार्क फार्माच्या लोकप्रिय उच्च रक्तदाब औषध Telma AM आणि मळमळ आणि उलट्या रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्केम हेल्थ सायन्सेसच्या Ondem-4 टॅब्लेटचे नमुने समाविष्ट आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एका नोटमध्ये म्हटले आहे की, हे फक्त सरकारी प्रयोगशाळांनी चाचणी केलेल्या औषधांपुरते मर्यादित आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर औषधी उत्पादनांबद्दल काळजी करण्याची गरज नाही.
हेही वाचा - अजब युक्तिवाद..! 'वजन कमी करण्यासाठी आरोपीला जामीन द्या'..न्यायालयाचं गजब उत्तर, '...म्हणूनच आरोपीला कोठडीत राहू द्या'
ऍलर्जीवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या औषधांचा समावेश -
NSQ यादीमध्ये निश्चित डोस संयोजनांचे (FDCs) बॅच देखील समाविष्ट आहेत. यामध्ये प्रामुख्याने कफ सिरप, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीबायोटिक्सचा समावेश आहे, जे टॉन्सिलिटिस, कानाचे संक्रमण, घशाचे संक्रमण, मूत्रमार्गाचे संक्रमण (UTI) आणि ब्राँकायटिस सारख्या जिवाणू संसर्गांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. काही औषधांच्या नमुन्यांमध्ये मॉन्टेलुकास्ट सोडियम आणि लेव्होसेटीरिझिन हायड्रोक्लोराइडच्या एफडीसी गोळ्यांचा समावेश आहे, ज्या सामान्यतः ऍलर्जीवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात.
हेही वाचा - IMF Prediction On Indian Economy: '2047 पर्यंत भारत बनू शकतो विकसित देश'; IMF ची मोठी भविष्यवाणी
या महिन्यात केंद्रीय प्रयोगशाळांनी घोषित केलेल्या NSQ औषधांपैकी बहुतेक औषधे अहमदाबाद आणि वडोदरा (गुजरात), बद्दी (हिमाचल प्रदेश), तारापूर (महाराष्ट्र), पुद्दुचेरी आणि हरिद्वार आणि रुरकी (उत्तराखंड) येथील कारखान्यांमध्ये उत्पादित केली गेली. तथापी, यावेळी सर्वोच्च औषध नियामकाने कोणतेही औषध बनावट म्हणून सूचीबद्ध केलेले नाही. सीडीएससीओ दुकाने किंवा इतर ठिकाणांहून औषधांचे नमुने गोळा करते. त्यानंतर त्या नमून्यांचे संशोधन करते आणि दरमहा सीडीएससीओ पोर्टलवर बनावट औषधांची यादी प्रसिद्ध करते.