Monday, September 01, 2025 04:37:50 AM

बलात्कार प्रकरणी जैन मुनी शांतीसागर महाराजांना १० वर्षांची शिक्षा

दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांनी एका १९ वर्षांच्या श्राविका (महिला जैन भक्त) हिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. हे प्रकरण न्यायालयात होते. ७ वर्षांनी शुक्रवारी याचा निकाल लागला.

बलात्कार प्रकरणी जैन मुनी शांतीसागर महाराजांना १० वर्षांची शिक्षा
बलात्कार प्रकरणी जैन मुनी शांतीसागर महाराजांना १० वर्षांची शिक्षा

सुरत : दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज बलात्कार प्रकरणात दोषी आढळले आहेत. त्यांना या प्रकरणी १० वर्ष तुरूंगवासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरत सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 
 
२०१७ मध्ये दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांनी एका १९ वर्षांच्या श्राविका (महिला जैन भक्त) हिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. हे प्रकरण न्यायालयात गेले. ७ वर्षांनी शुक्रवारी याचा निकाल लागला. यात न्यायालयाने दिंगबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांना दोषी ठरवलं आणि १० वर्षाची शिक्षा सुनावली. मेडिकल रिपोर्ट आणि सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा झाला. 

२०१७ मध्ये जैन मुनी सुरतमधील नानपूर येथील उपाश्रयात राहत होते. तेव्हा मध्य प्रदेशमध्ये राहणारी पीडिता आणि तिचे कुटूंबिय हे शांतीसागर यांच्या संपर्कात आले. पीडितेचे कुटुंबिय शांतीसागर यांना गुरू मानत होते. त्यांच्यावर त्यांची मोठी श्रद्धा होती. याचा फायदा शांतिसागर महाराजांनी घेतली. त्यांनी त्यांना पूजाविधीच्या बहाण्याने सुरत आश्रमात बोलावलं. रात्री कुटुंब आश्रयस्थानात राहिले. तेव्हा रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शांतीसागर यांनी मुलीला पूजेचे निमित्त करून त्यांच्या खोलीत बोलावलं आणि कुटुंबातील सदस्यांना खोलीबाहेर उभे राहण्यास सांगितलं. त्यांनी पूजेचा बहाणा करत पीडितेला धमकी देऊन बलात्कार केला. 

हेही वाचा - सावधान! 'हा' नियम मोडल्यास रेल्वे प्रवाशांना होऊ शकते 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षाही बाब पीडित मुलीनं कुटुंबियांना सांगितली. तेव्हा कुटुंबियांनी सुरूवातीला घाबरून ही बाब कोणाला सांगितली नाही. पण इतर मुलींसोबत असा प्रकार घडू शकतो. याचा विचार करून त्यांनी घटनेच्या १३ दिवसांनंतर सुरतमधील अथवलाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शांतीसागर यांना अटक केली. तेव्हापासून ते सतत सुरतमधील लाजपोर तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. आरोपपत्र सादर झाल्यापासून सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

हेही वाचा - आयकर विभागाचा पराक्रम! शेतकऱ्याला धाडली 30 कोटी रुपयांची नोटीस

सदर घटनेच्या आधी शांतीसागर हे मुलीशी फोनवर बोलले होते. त्यांनी पूजाविधीसाठी पीडितेचा नग्न फोटो मागितला होता, असा आरोप देखील पीडितेने केले आहे.  या प्रकरणात फिर्यादी पक्षाने ३३ साक्षीदार हजर केले. वैद्यकीय तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालासह सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून आरोप यशस्वीरित्या सिद्ध करण्यात आलं. सुरत सत्र न्यायालयाने आरोपी जैन मुनी शांतीसागर यांना २५ हजार दंडासह १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याचं सुरतचे सरकारी वकील नयन सुखाडावाला यांनी सांगितलं.  

 


सम्बन्धित सामग्री