नवी दिल्ली: दिल्लीमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजधानीच्या वसंत विहार भागात एका भरधाव वेगाने येणाऱ्या ऑडी कारने फूटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडले. 9 जुलै रोजी पहाटे 1:45 वाजता हा अपघात झाला. आरोपी चालक मद्यधुंद असल्याने तो पळून जाऊ शकला नाही. वसंत विहारमधील शिवा कॅम्पसमोर हा दुर्दैवी अपघात घडला. येथे काही लोक फूटपाथवर झोपले होते. त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारने पाच जणांना चिरडले.
अपघातावेळी चालक मद्यधुंद -
वैद्यकीय अहवालात ड्रग्ज सेवनाची पुष्टी झाली असून अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. आरोपीचे नाव उत्सव शेखर (40) असे आहे, जो द्वारकाचा रहिवासी आहे. तपासात तो मद्यधुंद असल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा - तामिळनाडूमध्ये डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला भीषण आग; मोठे नुकसान
जखमींची ओळख पटली -
जखमींची ओळख पटली असून यात लाधी (40), त्यांची 8 वर्षांची मुलगी बिमला, पती सबमी उर्फ चिरमा (45), राम चंदर (45), पत्नी नारायणी (35) अशी आहे. हे सर्वजण राजस्थानचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे आणि सध्या दिल्लीत मजूर म्हणून काम करतात.
हेही वाचा - Delhi Accident: दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती
दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला घटनास्थळीच पकडण्यात आले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार, हा अपघात निष्काळजीपणा आणि दारूच्या नशेमुळे झाला आहे. सध्या, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.