Wednesday, August 20, 2025 11:29:30 PM

भारतात आतापर्यंत कितीवेळा ढगफुटी झाली? विनाशकारी ढगफुटीच्या घटनांमध्ये गेला 'इतक्या' लोकांचा जीव

2013 मध्ये 16 आणि 17 जून रोजी उत्तराखंडच्या केदारनाथ परिसरात भीषण ढगफुटी आणि पुरामुळे कहर माजला होता. या महाविनाशात 5,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो लोक बेपत्ता झाले होते.

भारतात आतापर्यंत कितीवेळा ढगफुटी झाली विनाशकारी ढगफुटीच्या घटनांमध्ये गेला इतक्या लोकांचा जीव
Cloudburst Incidents in India
Edited Image

Cloudburst Incidents In India: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावामध्ये नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे प्रचंड विनाश घडून आला आहे. हर्षिल भागात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण धराली गाव ढिगाऱ्याखाली गेले असून, आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या ढगफुटीमुळे अनेक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. घटनास्थळावर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सैन्याच्या तुकड्या बचावकार्य करत आहेत. 

सोशल मीडियावर उत्तराखंडमधील ढगफुटीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जोरदार पावसाचा प्रवाह डोंगरावरून खाली येताना दिसत आहे. या प्रवाहात अनेक घरे, झाडे आणि सामान वाहून जाताना स्पष्टपणे दिसते. या भयंकर दृश्याने संपूर्ण देश हादरला आहे.

हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Viral Video: भयानक आपत्तीत चमत्कार! ढगफुटीच्या घटनेतून वाचलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ आला समोर

भारतात ढगफुटीचे काही प्रमुख विनाशकारी घटना - 

ऑगस्ट 1998 मध्ये उत्तराखंड राज्यातील कुमाऊँ भागातील काली खोऱ्यात ढगफुटी झाली होती. या भयावह घटनेत सुमारे 250 लोकांनी प्राण गमावले होते. 

1979 साली 17 ऑगस्ट रोजी रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कुंठा येथे ढगफुटी झाली होती. त्यात 39 जणांचा मृत्यू झाला होता.

2005 मध्ये जुलै महिन्यात मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर पावसामुळे ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली. यात 450 पेक्षा अधिक लोकांचे बळी गेले.

ऑगस्ट 2010 मध्ये लडाखमधील लेह येथे ढगफुटी झाली होती. त्यामध्ये सुमारे 250 ते 600 लोकांनी आपले प्राण गमावले.

सप्टेंबर 2012 मध्ये उत्तरकाशीमध्येही ढगफुटी झाली आणि सुमारे 45 जण मृत्युमुखी पडले.

2014 मध्ये सप्टेंबर महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या खोऱ्यात ढगफुटीमुळे सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला.

1991 मध्ये 16 ऑगस्ट रोजी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे 26 लोकांचे प्राण गेले.

1998 च्या 11 ते 19 ऑगस्टदरम्यान रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ तहसीलच्या भेंटी-पौंदर गावांमध्ये ढगफुटी झाली होती. या घटनेत सुमारे 103 लोक मरण पावले.

2019 मध्ये 18 ऑगस्ट रोजी उत्तरकाशी जिल्ह्यातील मोरी तहसीलच्या अराकोट भागात ढगफुटीमुळे 21 लोक मृत्युमुखी पडले.

2013 मध्ये 16 आणि 17 जून रोजी उत्तराखंडच्या केदारनाथ परिसरात भीषण ढगफुटी आणि पुरामुळे कहर माजला होता. या महाविनाशात 5,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो लोक बेपत्ता झाले होते.

2025 मध्ये हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात अनेकदा ढगफुटीच्या घटना घडल्या. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आणि अजूनही 27 लोक बेपत्ता आहेत.

हेही वाचा -  Cloudburst Hits Sukhi Village: उत्तराखंडमध्ये निसर्गाचा कोप! धरालीनंतर सुखी गावातही ढगफुटी

दरम्यान, आज उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धारली गावात ढगफुटीमुळे प्रचंड विनाश झाला आहे. ढगफुटीमुळे खीर गंगा येथे अचानक पूर आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सैन्याने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री