Wednesday, August 20, 2025 10:29:20 PM

महाकुंभात 30 कोटी रुपये कमावणाऱ्या नाविकाला आयकर विभागाची नोटीस; काय आहे प्रकरण? वाचा

नाविक पिंटू महरा यांनी महाकुंभमेळ्यादरम्यान फक्त 45 दिवसांत 30 कोटी रुपये कमावले. ही घटना प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली. आता पिंटू महरा यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे.

महाकुंभात 30 कोटी रुपये कमावणाऱ्या नाविकाला आयकर विभागाची नोटीस काय आहे प्रकरण वाचा
Prayagraj Boatman Pintu Mehra
Edited Image

प्रयागराजमधील अरैल गावातील नाविक पिंटू महरा यांनी महाकुंभमेळ्यादरम्यान फक्त 45 दिवसांत 30 कोटी रुपये कमावले. ही घटना प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत या बातमीवर चर्चा केली, त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मुख्यमंत्री म्हणाले की, महाकुंभमेळ्यादरम्यान, नाविक कुटुंबांनी असाधारण पैसे कमावले, प्रत्येक बोटीला दररोज 50,000-52,000 रुपये मिळत होते. पूर्वी एका बोटीतून फक्त 1,000-2,000 रुपये उत्पन्न मिळत होते, जे महाकुंभमेळ्यादरम्यान अनेक पटींनी वाढले. आता पिंटू महरा यांच्या उत्पन्न आणि कर सूचनेबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. 

नाविक पिंटू महरा यांना 12.8 कोटी रुपयांची कर नोटीस - 

दरम्यान, या अनपेक्षित उत्पन्नानंतर, पिंटू महराच्या समस्या वाढल्या आहेत. त्यांना आयकर विभागाकडून 12.8 कोटी रुपयांची कर नोटीस मिळाली. ही कर सूचना 1961 च्या आयकर कायदाच्या कलम 4 आणि 68 अंतर्गत जारी करण्यात आली असून ती पिंटू महारा यांच्यासाठी एक मोठे आर्थिक आव्हान बनली आहे. 

हेही वाचा - GST Rate Cut: जीएसटीचे दर आणखी कमी होणार! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पिंटू महारा यांनी महाकुंभमेळ्यादरम्यान बोटी चालवून 30 कोटी रुपये कमावले असल्याचे उघड केले. आर्थिक नियोजक आणि सेबी नोंदणीकृत संशोधन विश्लेषक ए.के. मानधन यांनीही एक्स वर पोस्ट केले आणि म्हटले की, ही कमाई पिंटू महरा यांच्यासाठी आर्थिक धक्का ठरली. मानधन यांच्या म्हणण्यानुसार, पिंटू महरा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य बोट चालवण्यात घालवले आणि दिवसाला जेमतेम 500 रुपये कमले होते. परंतु महाकुंभमेळ्यादरम्यान त्यांचे नशीब अचानक बदलले. 

हेही वाचा - दररोज 27 कोटी रुपयांपर्यंत देणगी देणारे भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती तुम्हाला माहित आहेत का?

अनियोजित उच्च उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी कर रचना काय असावी ? 

तथापि, ए.के. मानधन यांनी परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले की, अशा अनियोजित उच्च उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी स्वतंत्र कर रचना असावी का? त्याने इतरांसारखाच कर भरावा का, असा प्रश्नही विचारला. मानधन यांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये, जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीने जास्त कर भरावा, असा साधा कर नियम लागू करावा का? की अशा अनपेक्षित आणि एकदाच जास्त उत्पन्न असलेल्या प्रकरणांसाठी विशेष सूट किंवा चौकट असावी?

इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी दिली प्रतिक्रिया - 

याशिवाय, इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनीही या मुद्द्यावर आपले मत मांडले. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना आशा आहे की खलाशाचे कुटुंब इतर कोणत्याही व्यावसायिकाप्रमाणे आयकर भरेल. मला आशा आहे की तो @IncomeTaxIndia ला पैसे देईल कारण आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल बोलले आहे. 

असंघटित क्षेत्रावरील कर आकारणी, एक मोठे आव्हान - 

भारतातील असंघटित क्षेत्रावरील कर आकारणी हे एक मोठे आव्हान बनले आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आणि लघु व्यवसाय अनेकदा कायदेशीर चौकटीशिवाय काम करतात, ज्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कर अनुपालन आणि प्रशासन कठीण होते. पिंटू महराची कहाणी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी एक उदाहरण बनली आहे जे अचानक अनपेक्षितपणे प्रचंड पैसे कमवतात आणि नंतर त्यांना कराशी संबंधित प्रश्नांना तोंड द्यावे लागते.
 


सम्बन्धित सामग्री