Wednesday, August 20, 2025 09:32:14 AM

India vs Pakistan: भारताने पाकिस्तानी दूतावासाला वर्तमानपत्रांचा पुरवठा थांबवला; शत्रू देशाला दिलं सडेतोड उत्तर

नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाला स्थानिक वर्तमानपत्रांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानने सर्वप्रथम इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाला पाइपलाइन गॅसचा पुरवठा थांबवला.

india vs pakistan भारताने पाकिस्तानी दूतावासाला वर्तमानपत्रांचा पुरवठा थांबवला शत्रू देशाला दिलं सडेतोड उत्तर
Edited Image

India-Pakistan Tension: ऑपरेशन सिंदूरमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतरही पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगातील भारतीय राजदूत आणि कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधांचा पुरवठा रोखण्यात आला आहे. यात पिण्याचे पाणी, पाइपलाइन गॅस आणि स्थानिक वृत्तपत्रांचा पुरवठा यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Nitesh Rane on Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाचा भारतातील कोळंबीवरही परिणाम ; नितेश राणे म्हणाले, "कोळंबी खा..."

या कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही कठोर पाऊल उचलले असून, नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाला स्थानिक वर्तमानपत्रांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानने सर्वप्रथम इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाला पाइपलाइन गॅसचा पुरवठा थांबवला. यामुळे भारतीय राजदूत आणि त्यांच्या कुटुंबीयांना बाजारातून महाग दरात गॅस खरेदी करावा लागत आहे. त्याचबरोबर, पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण केले गेले आणि स्थानिक वृत्तपत्रांचा पुरवठाही बंद करण्यात आला. ही कारवाई थेट भारतीय उच्चायोगातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी ठरत आहे.

हेही वाचा - Zelensky Dials PM Modi: झेलेन्स्कींची पंतप्रधान मोदींशी चर्चा; शांतता प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

व्हिएन्ना कराराचे उल्लंघन - 

या सर्व घडामोडींना आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर मानले जात आहे, कारण व्हिएन्ना करारानुसार प्रत्येक देशाने आपल्या भूमीवरील परदेशी दूतावासांच्या सुरळीत कामकाजाची, सुरक्षिततेची आणि आदराची हमी द्यावी लागते. पाकिस्तानकडून केलेली ही पावले कराराच्या थेट उल्लंघनात गणली जात आहेत. भारताने पाकिस्तानच्या या पावलांना उत्तर देताना, पाकिस्तानी दूतावासाला वर्तमानपत्रांचा पुरवठा थांबवून संदेश दिला आहे की अशा दबाव तंत्राला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. या प्रकरणामुळे भारत-पाकिस्तान तणाव पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री