India to Buy Rafale-M Jets
Edited Image
दिल्ली: भारताने फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या मेगा डीलला मान्यता दिली आहे. 63000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा सरकारी करार लवकरच स्वाक्षरी केला जाईल. या करारानुसार, भारतीय नौदलाला 22 सिंगल-सीटर आणि चार ट्विन-सीटर विमाने मिळतील. प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती (CCS) कडून मंजुरी मिळाल्यानंतर फ्रान्सकडून 26 राफेल एम लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्तावित करार या महिन्यात अंतिम होण्याची शक्यता आहे.
भारताला राफेल-एम विमान कधी मिळणार?
विमानाची डिलिव्हरी 2029 च्या अखेरीस सुरू होईल. भारताला 2031 पर्यंत सर्व लढाऊ विमानं दिली जातील. ही रायफल-एम विमाने आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य सारख्या विमानवाहू जहाजांवरून चालवली जातील. दोन्ही नौदल जहाजे जुन्या झालेल्या मिग 29 के लढाऊ विमानांसह त्यांचे कार्य पार पाडतात.
हेही वाचा - नवीन टॅरिफ मागे घ्या...! एलोन मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन
दरम्यान, 26 राफेल मरीन जेट विमानांच्या खरेदीबाबत दोन्ही देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. 2016 मध्ये हवाई दलासाठी 36 विमाने खरेदी करताना भारताने ठेवलेल्या किमतीतच नौदलासाठी राफेल मरीनचा करार करायचा होता. या कराराची माहिती पहिल्यांदा पंतप्रधान मोदींच्या 2023 च्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान समोर आली.
हेही वाचा - 26/11 चा सूत्रधार अखेर भारताच्या तावडीत? तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून अमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय
तथापि, यानंतर संरक्षण मंत्रालयाने विनंती पत्र जारी केले, जे डिसेंबर 2023 मध्ये फ्रान्सने स्वीकारले. यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये, भारताने हवाई दलासाठी फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली होती. हा करार 59 हजार कोटी रुपयांना अंतिम झाला.