ISRO will launch EOS-09 satellite प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
नवी दिल्ली: भारतीय सैन्याची ताकद लवकरचं आणखी वाढणार आहे. कारण, आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुढील महिन्यात 18 जून रोजी EOS-09 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहाला RISAT-1B असेही म्हणतात. इस्रोचा हा उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल. या उपग्रहामुळे भारतीय लष्कराला कोणते फायदे होतील? ते जाणून घेऊया.
उपग्रह काढणार पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन फोटो -
हा उपग्रह इस्रो PSLV-C61 XL प्रक्षेपण वाहनाद्वारे प्रक्षेपित करेल. हे वाहन 1710 किलोग्रॅम वजनाचा EOS-09 उपग्रह 529 किमी उंचीवर असलेल्या कक्षेत घेऊन जाईल. भारताचा हा उपग्रह सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) ने सुसज्ज आहे, जो हवामानाची पर्वा न करता दिवसा आणि रात्री पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन फोटो प्रदान करेल.
हेही वाचा - भारतात सॅटेलाइटच्या मदतीने चालणार इंटरनेट! एलोन मस्कच्या स्टारलिंकला मिळाली मान्यता
उपग्रहाचा भारतीय सैन्याला काय फायदा होणार?
EOS-09 उपग्रह हा RISAT मालिकेतील सातवा उपग्रह आहे आणि देशाच्या संरक्षण कार्यात तो महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. हे लष्करी नियोजन आणि ऑपरेशन्ससाठी महत्त्वाची माहिती प्रदान करेल. तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि नैसर्गिक संसाधनांच्या देखरेखीसाठी या उपग्रहाची मदत होईल.
हेही वाचा - 55 वर्षांपासून शुक्र ग्रहावर असलेले रशियन अंतराळयान पृथ्वीवर कोसळणार; शास्त्रज्ञांमध्ये खळबळ
प्राप्त माहितीनुसार, 18 जून रोजी सकाळी 6:59 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोकडून उपग्रह प्रक्षेपित केला जाईल. या उपग्रहाचे प्रक्षेपण भारताच्या अंतराळ कार्यक्रमात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.