Indian Railway Rules: भारतीय रेल्वे वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेच्या विविध गाड्यांमध्ये प्रवास करतात, अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन रेल्वेने अनेक नियम बनवले आहेत, जे पाळणे बंधनकारक आहे. चला, जाणून घेऊया कोणत्या सीट मिळालेले प्रवासी वाटेल त्या वेळेला ट्रेनमध्ये झोपू शकत नाहीत.. काय आहे रेल्वेचा नियम?
जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपैकी एक असलेली भारतीय रेल्वे दररोज लाखो प्रवाशांना प्रवासाची सुविधा देते. रेल्वे संपूर्ण भारतात 10 हजारहून अधिक गाड्या चालवते, यात अनेक स्लीपर गाड्यांचा समावेश आहे. जे प्रवासी लांबचा किंवा रात्रीचा प्रवास करत असतात, ते बहुतेक स्लीपर सीटचं (झोपता येणारी सीट) तिकिट काढतात.
हेही वाचा - ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल तर Travel Insurance नक्की घ्या; काय आहेत प्रवास विम्याचे फायदे? जाणून घ्या
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने पाच ते सहा प्रकारचे कोच असतात - जनरल कॅटेगरी, स्लीपर, थर्ड एसी, थर्ड एसी इकॉनॉमी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी. तर, यामध्ये स्लीपर, थर्ड एसी आणि थर्ड एसी इकॉनॉमीमधील प्रवाशांना खालच्या, मधल्या आणि बाजूला असलेल्या खालच्या (side lower seat) बर्थची सुविधा दिली जाते. तेव्हा, मधल्या बर्थची सीट मिळवणाऱ्या प्रवाशाला भारतीय रेल्वेचे काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. यात एक नियम असा आहे, ज्यानुसार, प्रवासी दिवसा वाटेल त्या वेळी आडवा झोपू शकत नाही. त्यांच्यासाठी झोपेची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
खालच्या, मधल्या आणि बाजूला असलेल्या खालच्या (side lower seat) बर्थवरील प्रवाशांसाठी झोपण्याची वेळ कोणती?
या बर्थवर बसणाऱ्या प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या नियमांची माहिती असली पाहिजे. स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना या बर्थमुळे अनेकदा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेकदा नियम माहिती नसल्यामुळे प्रवाशांमध्ये आपापसांत वादावादी होते.
फक्त रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत या सीटचं तिकिट असलेले प्रवासी त्यावर आडवे झोपू शकतात. या वेळेशिवाय या सीटवर आडवे झोपण्याची परवानगी नाही. तसेच, मधला बर्थ उघडूनही ठेवलेला चालत नाही. कारण, त्यामुळे खालच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांची गैरसोय होते. तुम्ही असे केल्यास इतर सहप्रवासी तुम्हाला थांबवू शकतात. त्यांना तुम्ही विरोध केल्यास तुम्हाला दंड देखील होऊ शकतो. तेव्हा रात्री 10 नंतर आणि सकाली 6 वाजण्यापूर्वीच या बर्थवरती आडवे झोपून आराम करता येईल.
मधल्या बर्थवरील व्यक्तीला अधिकार आहेत
जर तुमच्याकडे मधला बर्थ असेल आणि सहप्रवासी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत खालच्या बर्थवर बसले असतील, तर तुम्ही त्यांना झोपायला सांगू शकता आणि तुमचा बर्थ उघडू शकता. हे सांगणे तुमचा अधिकार आहे. यावेळी तुम्ही तुमचा मधला बर्थ उघडून आराम करण्यास मोकळे आहात, पण लक्षात ठेवा की सकाळी ६ नंतर तुम्हाला मधला बर्थ बंद करावा लागेल.
या प्रवाशांना मिळू शकेल दिलासा
भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी मधल्या बर्थवर बसणाऱ्या आजारी, अपंग, गर्भवती किंवा वृद्धांना सहकार्य करावे. त्यांना जास्त वेळ झोपण्याची इच्छा असेल त्यानुसार सहकार्य करावे किंवा गरज असल्यास त्यांना मदत म्हणून खालच्या बर्थची सुविधा द्यावी. असे केल्याने या प्रवाशांना प्रवासादरम्यान जास्त त्रास सहन करावा लागणार नाही.
हेही वाचा - Damaged Notes from ATM : एटीएम मधून फाटकी नोट मिळाली तर काय करायचं? काय आहे RBI चा नियम?
रात्री 10 नंतर दिवे बंद करण्याचा नियम
रात्री 10 नंतर नाईट लॅम्प वगळता सर्व दिवे बंद करावेत. जर तुमच्यासोबत जास्त लोक असतील आणि तुम्ही ग्रुपने प्रवास करणारे प्रवासी असाल तर, रात्री 10 नंतर मोठ्याने गप्पा मारणे, गोंगाट करणे, गाणी म्हणणे, मोबाईवर गाणी वाजवणे चालणार नाही. जर रात्री 10 नंतर मधल्या बर्थवरील प्रवाशाने आपली सीट उघडली तर खालच्या बर्थवर बसलेला प्रवासी काहीही बोलू शकत नाही. तसेच, खालच्या किंवा बाजूला असलेल्या खालच्या बर्थवरील प्रवाशाने रात्री 10 नंतर आडवे झोपून आराम करण्याची इच्छा दर्शवली तर इतरांनाही त्याचे म्हणणे मान्य करावे लागेल. रेल्वे सेवांमध्ये ऑनलाइन अन्न सेवा रात्री 10 नंतर जेवण पुरवत नाही. मात्र, तुम्ही ई-केटरिंग सेवांसह रात्रीच्या वेळीही ट्रेनमध्ये तुमचे जेवण किंवा नाश्ता या वेळेपूर्वीच ऑर्डर करून ठेवू शकता.