Wednesday, August 20, 2025 11:56:21 PM

भारतीय संघाची विक्रमी कामगिरी! 66 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये जिंकली 3 सुवर्ण पदके

सहा सदस्यीय भारतीय संघाने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत देशासाठी मानाचा टप्पा गाठला. याशिवाय, संघाने एकत्रित 193 गुण मिळवत देशासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक गुणांचा विक्रमही नोंदवला आहे.

भारतीय संघाची विक्रमी कामगिरी 66 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये जिंकली 3 सुवर्ण पदके

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे पार पडलेल्या 66 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाड (IMO) 2025 मध्ये भारताने अभूतपूर्व यश मिळवत 7 वे स्थान पटकावले आहे. सहा सदस्यीय भारतीय संघाने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत देशासाठी मानाचा टप्पा गाठला. याशिवाय, संघाने एकत्रित 193 गुण मिळवत देशासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक गुणांचा विक्रमही नोंदवला आहे.

दरम्यान, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE) ने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, IMO मध्ये भारताने तीन सुवर्णपदके जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. 2024 मध्ये, भारताने चार सुवर्णपदके जिंकून चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्तम क्रमांक मिळवून इतिहास रचला होता. 2019 ते 2025 दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांनी एकूण 12 सुवर्णपदके जिंकली आहेत, ज्यात गेल्या तीन वर्षांत (2023, 2024 आणि 2025) नऊ सुवर्णपदकांचा समावेश आहे. 1989 मध्ये पदार्पण केल्यापासून आयएमओमध्ये 35 वेळा झालेल्या सामन्यांमध्ये भारताने सात वेळा टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.

ऐतिहासिक कामगिरी करणारे विद्यार्थी - 

सुवर्ण पदक विजेते: कणव तलवार, आरव गुप्ता, आदित्य मंगुडी वेंकट गणेश

रौप्य पदक विजेते: अबेल जॉर्ज मॅथ्यू, आदिश जैन

कांस्य पदक विजेते: अर्चित मानस

या वर्षी भारताने एकत्रित 193 गुण मिळवून 252 पैकी सर्वाधिक स्कोअर नोंदवला, जो 1989 मध्ये IMO मध्ये पदार्पण केल्यापासून सर्वोच्च आहे. विशेष म्हणजे, तीन सुवर्ण पदके जिंकण्याची ही केवळ दुसरी वेळ असून, याआधी 1988 मध्ये हे घडले होते.

हेही वाचा - SAINA NEHWAL DIVORCE: तब्बल 7 वर्षानंतर घटस्फोट; नेमकं कारण काय? जाणून घ्या

प्रशिक्षण आणि मार्गदर्शन - 

भारतीय संघाला चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटमध्ये (CMI) प्रशिक्षण देण्यात आले होते. या टीमचे नेतृत्व इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, दिल्ली येथील प्रा. शांता लैशराम आणि आयएसआय बेंगळुरूचे डॉ. मैनक घोष यांनी केले.

हेही वाचा - मोठी घोषणा! आता 'ही' नवीन क्रिकेट लीग भारतात सुरू होणार

IMO म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाड ही हायस्कूल विद्यार्थ्यांसाठीची जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची गणित स्पर्धा असून तिचा आरंभ 1959 साली रोमानियात झाला. आज ही स्पर्धा 100 हून अधिक देशांमध्ये होत असून भारताने त्यात सातव्यांदा टॉप-10 मध्ये स्थान पटकावले आहे.


सम्बन्धित सामग्री