नवी दिल्ली: भारतीय सैन्याला अखेर अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली खेप प्राप्त झाली आहे. हे शक्तिशाली हेलिकॉप्टर्स जोधपूरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे पश्चिम सीमेवरील हल्ला क्षमता आणि युद्धक्षेत्रातील वेग लक्षणीय वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवाई दलाकडे आधीच अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत. सध्या, आणखी अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी भारतीय सैन्याला देण्यात आली आहे.
प्रगत तंत्रज्ञान आणि सेन्सर यंत्रणा -
अपाचे हेलिकॉप्टर नाईट व्हिजन, थर्मल सेन्सर, लक्ष्य अधिग्रहण प्रणाली (TADS) आणि पायलट नाईट व्हिजन सेन्सर (PNVS) ने सज्ज आहे. हे हेलिकॉप्टर 60 सेकंदांत 128 हलणारी लक्ष्ये ओळखून नष्ट करू शकते. यामध्ये AN/APG-78 लाँगबो रडार आणि JTIDS डिजिटल सिस्टीम बसवण्यात आली आहे.
फायरपॉवर आणि वेपन सिस्टम
हे कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रति मिनिट 625 राउंड फायर करू शकते. हे हेलिकॉप्टर एजीएम-114 हेलफायर मिसाइल सिस्टमने सुसज्ज आहे जे अँटी-टँक, लेसर-गाइडेड मिसाइल, आर्मर्ड व्हेइकल्स नष्ट करण्यास सक्षम आहे. याशिवाय, त्यात बसवलेले हायड्रा 70 रॉकेट हे 70 मिमी अनगाइडेड रॉकेट आहे, जे जमिनीवरील लक्ष्य नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच, त्यात बसवलेले स्टिंगर मिसाइल हे हवेतून हवेत मारा करणारे मिसाइल आहे.
एकाच वेळी 16 लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता -
या हेलिकॉप्टरमध्ये बसवलेले स्पाइक एनएलओएस मिसाइल हे एक लांब पल्ल्याचे मिसाइल आहे, ज्यामध्ये स्टँड-ऑफ अटॅक करण्याची क्षमता आहे. तसेच, हे हेलिकॉप्टर मल्टी-टार्गेटिंगच्या क्षमतेने सुसज्ज आहे. याचा अर्थ असा की हे हेलिकॉप्टर एका मिनिटात एकाच वेळी 16 लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता ठेवते.
हेही वाचा - राजस्थान सीमेवर नोटम जारी! IAF भारत-पाकिस्तान सीमेजवळ करणार सराव
वेग आणि रेंज -
अपाचे हेलिकॉप्टरचा कमाल वेग 280-365 किमी/तास, आणि ऑपरेशनल रेंज 480 ते 500 किमी आहे. एकदा उड्डाण केल्यानंतर ते 3 ते 3.5 तास हवेत राहू शकते.
हेही वाचा - दुर्दैवी! बांगलादेशातील विमान अपघातात 16 विद्यार्थी, 2 शिक्षकांसह 19 जणांचा मृत्यू
भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील झालेले अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर युद्धक्षमता, बहुउद्देशीय तैनाती आणि गती यांचा संगम आहे. यामुळे भारताची पश्चिम सीमांवरील स्थिती अधिक मजबूत होईल आणि भारतीय लष्कराला भविष्यातील लढाया अधिक आत्मविश्वासाने लढता येतील.