India's economy has improved
Edited Image
India's Q3 GDP Growth: देशभरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत आता सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 6.2% पर्यंत वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा दर 5.4% होता. याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था मागील तिमाहीच्या तुलनेत सुधारली आहे. शुक्रवारी जारी केलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. तथापि, वार्षिक आधारावर पाहिले तर, विकास दर कमी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर 9.5 टक्के होता. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी वास्तविक जीडीपी वाढीचा दर 5.6% पर्यंत सुधारित करण्यात आला आहे.
हेही वाचा - EPFO Interest Rate: ईपीएफओच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, खात्यात जमा पैशांवर किती व्याजदर मिळणार? जाणून घ्या
2024-25 साठी विकास दराचा अंदाज -
सीएसओने राष्ट्रीय खात्यांच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात 2024-25 साठी देशाचा विकास दर 6.5 प्रटक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जानेवारी 2025 मध्ये जाहीर झालेल्या पहिल्या आगाऊ अंदाजात, चालू आर्थिक वर्षासाठी 6.4 टक्के वाढीचा अंदाज होता.
ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, 2024-25 या आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी किंवा स्थिर किमतींवर जीडीपी 187.95 लाख कोटीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर 2023-24 या वर्षासाठी जीडीपीचा पहिला सुधारित अंदाज 176.51 लाख कोटी आहे. त्याचप्रमाणे, 2024-25 मध्ये वास्तविक जीडीपी वाढीचा दर 6.5 % राहण्याचा अंदाज आहे. 2023-24 मध्ये तो 9.2% होता. नाममात्र जीडीपी किंवा सध्याच्या किमतींवर जीडीपी 2024-25 मध्ये 331.03 लाख कोटीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो 2023-24 मध्ये 301.23 लाख कोटी होता.
हेही वाचा - टॉप 24 सुपर अब्जाधीशांच्या यादीत अंबानी-अदानीचा समावेश; कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? जाणून घ्या
याशिवाय, 2024-25 या आर्थिक वर्षात बांधकाम क्षेत्राचा विकास दर 8.6 टक्के, वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राचा 7.2 टक्के आणि व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारण सेवा क्षेत्राचा 6.4 टक्के वाढीचा अंदाज आहे.