IndiGo flight from Delhi to Goa suffers engine failure
Edited Image
नवी दिल्ली: दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E6271 च्या एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पायलटने तात्काळ सावधगिरी दाखवली आणि विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. इंडिगोच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले की, 16 जुलै 2025 रोजी, दिल्लीहून गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करत असताना, विमान क्रमांक 6E 6271 मध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. पायलटच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली असून, सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने घेतले 3 मोठे निर्णय
इंडिगोने जारी केले निवेदन -
इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'विमान 6E6271 हे दिल्लीहून गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना तांत्रिक बिघाडाची नोंद झाली. योग्य ती सुरक्षा प्रक्रिया राबवून, विमान वळवण्यात आले आणि मुंबईत सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. प्रवाशांच्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.'
हेही वाचा - धनबादमध्ये उंदरांवर 800 बाटल्या दारू पिल्याचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?
हवेत इंजिनमध्ये बिघाड -
दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर विमानाच्या एका इंजिनमध्ये हवेत बिघाड झाला, त्यानंतर पायलटने ताबडतोब त्याची तक्रार केली आणि नंतर मुंबईत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. बुधवारी रात्री 9.25 वाजता आपत्कालीन अलार्म वाजल्यानंतर, विमानतळावर संपूर्ण आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आला. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आणि त्यानंतर रात्री 9.42 वाजता विमान सुरक्षितपणे उतरले. विमानातील सर्व क्रू मेंबर्स आणि प्रवासी सुरक्षित आहेत.